डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल व्हाट्सएप ग्रुपवर अवमानकारक मजकूर टाकणाऱ्या दोन व्यक्तीची समाजापुढे जाहीर माफी… सावली तालुक्यातील केरोडा येथील घटना …

1870

सुनील डी डोंगरे
कार्यकारी संपादक

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल व्हाट्सएप ग्रुपवर अवमानकारक मजकूर टाकणाऱ्या व्यक्तीने बौद्ध समाजाच्या कार्यक्रमात येऊन घडलेल्या घटनेबाबत खेद व्यक्त करून तोंडी आणी लेखी स्वरूपात  जाहीर माफी मागितली आहे.
या संदर्भात सविस्तर असे की, सावली तालुक्यातील मौजा केरोडा येथील  स्वप्नील रमेश यामावार  व  राकेश दिलीप यामावार या व्यक्तीने २० एप्रिल २०१७ रोजी केरोडा वारिअर या गावच्या व्हाट्सअप ग्रुपवर ‘डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी एकट्यांनीच राज्यघटना लिहिली नाही.घटना समितीच्या इतर सदस्यांनीही या कामात मदत केली ‘अशा आशयाचा मजकूर लिहून फॉरवर्ड केला होता.
तेंव्हा बौद्ध समाजात संतापाची भावना निर्माण झाली.समाजाच्या वतीने सावली पोलीस स्टेशन मध्ये स्वप्निल यामावार राकेश यामावार यांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली.सावली न्यायालयात प्रकरण सुरु आहे.
१९ ऑक्टोंबर रोजी केरोडा येथील बौद्ध समाजातर्फे वर्षावास समापण निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बौद्ध समाजाकडे स्वप्निल व राकेश यामावार यांनी लेखी माफीनामा सादर केला.’कार्यक्रमात येऊन समाजापुढे जाहीर माफी मागितली ‘अशी समाजाने भूमिका घेतल्याने राकेश यामावर यांनी कार्यक्रमात प्रत्यक्ष येऊन तथागत बुद्ध आणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना मालयार्पण करून अभिवादन केले.
आणी नंतर झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करून लेखी माफीनामा जाहिररित्या वाचून दाखवला. उदार अंतकरणाने बौद्ध समाजाने त्यांना माफ केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  माननीय रोहिदास राऊत हे होते तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पूज्य भंते  धम्मज्योती भीम आर्मी चे जिल्हाध्यक्ष माननीय जितेंद्र डोहने समाज समता संघाचे जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे सामाजिक कार्यकर्ते सुभाष ढोलने भारतीय बौद्ध महासभा सावली तालुका अध्यक्ष प्रकाश माहुरकर ग्रामपंचायत केरोडा च्या सरपंच सोनी ताई राऊत उपसरपंच ओम प्रकाश ढोलणे एडवोकेट शेंडे गोपाल रायपुरे तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोहर चलाख माजी सैनिक विनोद साखरे उमेश खोबरागडे घनश्याम भडके नरेंद्र पाटील चंद्रहास रामटेकेआदी मंचावर विराजमान होते
या याप्रसंगी केरोडा चे ग्रामसेवक श्री ननावरे पाणी समितीचे सुरेश बद्दलवार प्रवीण शेरकी एकनाथ ठाकूर रामदास कन्नाके पत्रुजी बोरसे नितेश कावट आवार विश्वेश्वर काटलादिलीप यामा वार दिलीप चलाख कर्मवीर भुरसे खुजे कापडे आणि समस्त शिक्षक वृंद केरोडा भीम आर्मी चे  मृत्युंजय रामटेके योगेश्वर रामटेके उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष प्रकाश भुसारे आणि सचिव विनोद सहारे यांनी अथक परिश्रम घेतले