बीफार्मसीच्या १२ विद्यार्थ्याच्या निकालामध्ये गोंधळ…फार्मसी कृती समिती चंद्रपूर चे जिल्हा अध्यक्ष सागर मंडल व जिल्हा सचिव सुरज गव्हाने यांचा हस्तक्षेप..2 दिवसात निकाल लावु असे विद्यापीठाचे आश्वासन

470

 

राजुरा: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या चंद्रपुर येथील हायटेक कॉलेज ऑफ फार्मसीच्या १२ विद्यार्थ्यांच्या निकालात गोंधळ करण्यात आला. सेकंड इयरमध्ये एडमिशन घेणाऱ्या १२ विद्यार्थ्याचे फायनल इयर तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निकालात विद्यापीठाच्या व काॅलेजच्या भोंगळ्या कारभारामुळे १२ विद्यार्थ्याच्या पदवीच्या निकालामध्ये गोंधळ झाला. आणि त्यामुळे या १२ विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कार्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. याची माहिती फार्मसी कृती समिती चंद्रपूर यांना कळताच, जिल्हा अध्यक्ष सागर मंडल, जिल्हा सचिव सुरज गव्हाने यांनी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे जाऊन तेथील संबधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेट दिली व त्यांना विद्यार्थ्याच्या समस्येबद्दल सांगितले. आणि यावर तत्काळ निर्णय घ्यावे अशी अधिकाऱ्यांना मागणी केली. या मागणीची दखल घेत विद्यापीठाने २ दिवसात संबधित विभागाचे तांत्रिक अडचण दुर करून निकाल बरोबर लावण्याचे आश्वासन दिले.