फौजी समीरचे चेकपिपरी येथे जल्लोषात स्वागत…

1520

गोंडपिपरी:- गोंडपिपरी येथून जवळच असलेल्या चेकपिपरी येथील फौजी समीर विनोद मुत्तेवार यांचे गावात जल्लोषात स्वागत करण्यात आले. डिसेंबर २०१९ मध्ये झालेल्या सैन्य भरती मध्ये समीर ची निवड झाली होती.

सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या समीर चे प्राथमिक शिक्षण गावातील च जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चेकपिपरी येथे झाले. लहानपणापासूनच सैन्यात जाण्याची आवड असल्याने समीरने समोरील शिक्षण सरदार पटेल कॉलेज चंद्रपूर येथे सुरु केले. व सोबतच सैन्य भरतीची तयारी सुद्धा सुरू केली.

९ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या सैन्य भरतीत समीर ची निवड झाली. १५ आक्टोबर २०२० ला समीर सैन्य प्रशिक्षण केंद्र बेळगाव (कर्नाटक) येथे दाखल झाला. ६ सप्टेंबर२०२१ ला सैन्य शपथविधी समारंभ संपन्न झाला आणि सामान्य शेतकरी कुटुंबातील समीर फौजी झाला. समीर हा सैन्यात भरती होणारा गावातील पहिलाच असल्याने गावातील युवकांसाठी तो प्रेरणादायी ठरला आहे. सद्या समीर स्वगावी परतला असून ८ नोव्हेंबर ला जामनगर (गुजरात) येथे देश सेवेसाठी रुजू होणार आहे.