वीज पडून चार जण गंभीर जखमी

319

दिपक साबने,जिवती

जिवती: तालुक्यातील माराई पाटण गावातील शिवारात विजाच्या कडकडाटा सह पाऊस पडला त्यात वीज प्रकाश सोनकांबळे यांच्या शेतामध्ये वीज पडून वच्‍छलाबाई प्रकाश सोनकांबळे (४५), सत्यभामा कांबळे (५०), प्रकाश सोनकांबळे (५०), त्रिशरण काळे (८) हे चार जण वीज पडून गंभीर जखमी झाले आहेत.

शेतकऱ्यांवर अस्मानी सुलतानी संकटाचे सावट असताना तसेच त्यातच एक नवीन नैसर्गिक आपत्ती वीज पडून जखमी झाल्याच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
आज तालुक्यात पडलेल्या पावसात ०४:०० वाजता प्रकाश सोनकांबळे (५०), वच्‍छलाबाई प्रकाश सोनकांबळे (४५), सत्यभामा कांबळे (५०), त्रिशरण काळे (८) हे शेतात काम करत असताना अचानक वीज पडली त्यात सर्व जण गंभीर जखमी झाले आहेत त्यापैकी प्रकाश सोनकांबळे (५०), सत्यभामा कांबळे (५०), त्रिशरण काळे (८) यांचा सध्या ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे त्यांचा उपचार सुरू आहे. आणि वच्‍छलाबाई प्रकाश सोनकांबळे (४५) हे जास्त गंभीर जखमी असल्याने ग्रामीण रुग्णालय गडचांदूर वरून जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे.