आलापल्ली ते सिरोंचा मार्गावरील रेपनपल्ली जवळ झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प..

270

सिरोंचा :-

आलापल्ली ते सिरोंचा मार्गावरील रेपनपल्ली जवळ मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने बुधवारी सकाळपासून वाहतूक बंद होती. त्यामुळे दोन्ही बाजुने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
अहेरी उपविभागात रात्री वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे कोसळली. सकाळी रेपनपल्लीजवळ मोठे झाड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे सिरोंचाकडे जाणारी आणि आलापल्लीकडे येणारी वाहतूक बंद होती. झाड मोठे असल्याने कोणतेच वाहन जाऊ शकत नव्हते. त्यामुळे दोन्ही बाजुने शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अनेक तास झाड तसेच राहिल्याने अहेरी आगाराची अहेरी-सिरोंचा बस राजाराममार्गे वळवून सिरोंचाकडे नेण्यात आली. आधीच रस्ता खराब असल्याने आलापल्ली-सिरोंचा मार्ग पूर्णतः खराब आहे. सिरोंचा जाण्यास किंवा तेथून आलापल्लीकडे येण्यास चार ते पाच तास लागतात. मात्र, झाड पडल्याने अनेक तास नागरिकांना थांबून राहावे लागते. बऱ्याच वेळानंतर झाड हटविल्यानंतर वाहतूक सुरू झाली. यादरम्यान अनेकांची महत्त्वाची कामे थांबल्याने नागरिकांमध्ये रोष पसरला होता.