डेंगू,मलेरिया या रोगावर उपाययोजना करा अन्यथा महानगरपालिकेवर आंदोलन..महानगरपालिकेला शिवसेनेचा इशारा

307

चंद्रपुर महानगर मध्ये खुप मोठ्या प्रमाणामध्ये डेंगू मलेरिया रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे.रूग्नसंख्या वाढीमुळे चंद्रपुरच्या रूग्णालयात रूग्णांना बेड ची सुद्धा उपलब्धता होत नसून यात काही रुग्ण सुद्धा दगावलेले परंतू परिस्थिती इतकी गंभीर असतांना सुद्धा महानगरपालिका प्रशासनाच्या काहीच उपाययोजना दिसून येत नसून प्रशासन झोपलेले आहे की काय असतं दिसून येत आहे . रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले असतांना त्यांत अवकाळी पावसाचे सांडपाणी साचून डबके तयार झालेले आहे हे सुद्धा डेंगू, मलेरिया वाढीसाठी कारणीभूत ठरत असून यावर सुद्धा काही उपाययोजना करण्यात येत नाही आहे. नागरीकांच्या आरोग्याबाबत महानगरपालिका गंभीर नसून यावर लवकर उपाययोजना करून डेंगू, मलेरिया आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे या करीता प्रत्येक प्रभागामध्ये फवारणी करने, लोकांच्या घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करून औषधे उपलब्ध करून देने, नागरिकांमध्ये स्वच्छता विषयक जनजागृती करने , लवकरात लवकर महानगरपालिका हदीतील सर्व खड्डयांची दुरूस्ती करावी यासारख्या मागणी चे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगर प्रमुख प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना च्याशिष्टमंडळाद्वारे महानगर पालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले. जर या उपाययोजना लवकरात लवकर ८ दिवसाच्या आत केल्या नाही तर चंद्रपुर महानगर शिवसेना च्या वतीने महानगर पालिका विरोधात तिव्र आंदोलन घेण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देतांना शिष्टमंडळात युवासेना जिल्हा प्रमुख निलेश बेलखेडे, शिवसेनेचे राहूल विरूटकर, स्वप्निल काशीकर, वसिमभाई, शिवसेना उपशहर प्रमुख हर्षल कानमपल्लीवार, प्रकाश चंदनखेडे, बंडू जांगळे, युवासेना समन्वयक गणेश रासपायले, अक्षय बेलखोडे,किरण ठाकरे, अभिला़ष कुंभारे,नरेश पटेल यांची उपस्थिती होती.