घुग्गुस नगरपरिषदेच्या गोदामाला आग…महत्त्वाचे दस्तावेज जळून खाक

471

चंद्रपूर शहरापासून 20 किमीवर असलेल्या घुग्गुस येथील नवगठीत नगरपरिषद इमारतीला आज सकाळी अचानक आग लागली. इमारत परिसरातील गोदामाला लागलेल्या आगीत गोदामातील साहित्य खाक झाले आहे.

गोदामवजा इमारतीत ग्रामपंचायतीशी संबंधित महत्त्वाचे दस्तावेज व एका कथित विद्युत भ्रष्टाचाराशी संबंधित विजेचे साहित्य असल्याचा आरोप करण्यात येत आहे. घुग्गुस औद्योगिक शहर आहे. शहराच्या आसपासच्या उद्योगातील अग्निशमन वाहनांच्या मदतीने आग विझवण्यात आली.

ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार लपविण्यासाठी ही आग मुद्दाम लावल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यानी केला आहे, तर पालिकेच्या प्रथम मुख्याधिकारी अर्शिया जुही यांनी वीज भ्रष्टाचार प्रकरण व संशयित आग दोन्हीची चौकशी होणार असल्याचे सांगितले आहे. दरम्यन, ही आग कशी लागली हे अद्याप कळू शकलेलं नाही आहे.