Home Breaking News धक्कादायक: वरोऱ्यात २१ वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…

धक्कादायक: वरोऱ्यात २१ वर्षीय युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…

374

वरोरा : शहरातील खांजी परिसरात २१ वर्षीय युवतीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मोना हरिदयाल चव्हाण असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही.

मृतक मोनाने काल दुपारी घरी कोणीही नसल्याचे बघत घरातील वरच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. वडील घरी आल्यानंतर दार उघडत नसल्याने दरवाजा तोडून खोली मध्ये बघितले असता मोनाने गळफास घेतलेले आढळले.

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी दाखले झाले. दरम्यान खोलीमध्ये एक चिठ्ठी आढळून आली ‘कारण काही नाही बाबा आई व भावाकडे लक्ष द्या’ असे चिट्ठी मध्ये मजकूर नमूद करण्यात आला होता. याप्रकरणी वरोरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Don`t copy text!