Home एटापल्ली बापरे: चक्क त्यांनी शेतात लपविली होती अडीच लाखांची दारू…

बापरे: चक्क त्यांनी शेतात लपविली होती अडीच लाखांची दारू…

631

एटापल्ली :- तालुक्यातील कसनसूर उपपोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका शेतशिवारात तब्बल अडीच लाख रुपयांची दारू लपवून ठेवली असल्याचे उघडकीस आले. गुप्त माहितीवरून पोलिसांनी छापा मारून दारूसाठा जप्त करत एका आरोपीला अटक केली. तर दुसरा पळून जाण्यास यशस्वी झाला.

जायजोन सॅम्युअल टोपो (५५) रा.वेनासर, ता. एटापल्ली असे अटक केलेल्या तर मनोज जगदीश मुजुमदार रा. एटापल्ली असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. वेनासर येथील शेतशिवारात असलेल्या आरोपीच्या झोपडीत दारूसाठा लपवून ठेवण्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी दोन साक्षीदारांसह झोपडीची तपासणी केली. त्यात गोवा विस्की कंपनीच्या १८० मिलीच्या देशी विदेशी दारूच्या १६८० नग निप आढळल्या. त्यांची किंमत २ लाख ५२ हजार रुपये आहे. या ठिकाणावरून दारूचा पुरवठा किरकोळ विक्रेत्यांना केला जात असल्याचे तपासात समोर आले.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संकेत नानोटी यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दुर्योधन राठोड, ज्ञानेश्वर धनगर, महेश गरड तसेच पोलीस हवालदार राजू उराडे, नायक सुनील मडावी, शिपाई धरमदास भुसारी, संजय देशमुख लक्षण तरंगे यांनी केली.

Don`t copy text!