पालावरच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करुन प्रीती दरेकर यांनी केला वाढदिवस साजरा ● बेटी फाउंडेशनच्या संस्थापिकाचे आगळे वेगळे उपक्रम.

323

यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी चक्रधर मेश्राम

समाज कार्यात अग्रणी येथील बेटी फाउंडेशनच्या संस्थापिका/अध्यक्षा प्रिती दरेकर यांनी आपला वाढदिवस एका आगळ्या वेगळ्या पद्दतिने साजरा केला. वाशीम येथील महिला पोलीस कर्मचारी संगीता ढोले यांच्या कार्याने प्रेरित होऊन प्रीती दरेकर यांनी आपला वाढदिवस 19 ऑगस्ट रोजी वाशीम येथील पालावरच्या मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करून वाढदिवसाचा आनंद द्विगुणित केला. प्रीती दरेकर यांनी राबविलेले या उपक्रमाचे वर्दीतील स्त्रीशक्ती संगीता ढोले हिनेसुद्दा कौतुक केले.
वणी येथील प्रिती दरेकर बेटी फाउंडेशनच्या माध्यमातून समाजातील तळागाळातील कर्तव्यदक्ष समाजसेवकांच्या नेहमी शोधात असतात. प्रीती दरेकर सन 2014 पासुन समाजसेवेच्या कार्यात आहेत. विशेष म्हणजे प्रसिद्दीपासून दूर राहिलेले गाव खेड्यातील साहित्यिक, कवी, समाजसेवक अशा व्यक्तींना त्यांचे हक्काची व्यासपीठ प्रीती दरेकर यांनी मिळवुन दिले आहे. प्रकाश झोतातून दूर असलेले अश्या व्यक्तींना सन्मान देण्यासाठी बेटी फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सन्मान सोहळा आयोजित केल्या जाते.
अशातच वाशीम पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस कॉन्स्टेबल संगीता ढोले या शासकीय कर्तव्य पार पाडीत शेलु फाटा परिसरातील पालावरच्या गोरगरीब मुला-मुलींना शिक्षणाचे धडे देत असल्याची माहिती प्रीती दरेकर हिला मिळाली. झोपडपट्टीतील व भटक्या जमातिच्या भरकटलेल्या मुलांना योग्य दिशा देवुन शिक्षण देण्याचं काम करणाऱ्या संगीता ढोले यांच्या कार्याला प्रेरित होऊन प्रीती दरेकर हिने आपले वाढदिवस आगळ्या वेगळ्या प्रकारे साजरा करण्याचा निर्णय घेतला.
वाढदिवसाच्या कार्यक्रमात मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप केले आणि मुलांसाठी नाश्ताची व्यवस्था केली. या कार्यक्रमाला डाॕ. मंजुश्री जांभरुणकर आणि पालावरील विद्यार्थ्यांचे सर्व पालक उपस्थित होते, ह्या कार्यक्रमात प्रिती दरेकर हिने मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी डाॕ.मंजुश्री जांभरुणकर ह्यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले.