स्वातंत्र्य दिनानिमित्त दिव्यांग प्रमाणपत्र, बस पास वितरण…

268

प्रीतम गग्गुरी प्रतिनिधी

सिरोंचा :- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सिरोंचा पोलिस ठाण्याच्या वतीने ठाणे हद्दीतील दुर्गम भागातील दिव्यांग नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्र तसेच बस पासचे वितरण करण्यात आले.तालुक्यातील दुर्गम भागातील दिव्यांगांना त्यांचे प्रमाणपत्र काढण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे जाणे कठीण होत होते. ही बाब हेरून सिरोंचा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या
मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजय अहिरकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीकिशन कांदे यांनी गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करून दिव्यांग नागरिकांना दिव्यांग प्रमाणपत्र काढून देण्यात आले. तसेच बस पास सुध्दा त्यांना उपलब्ध करून देण्यात आले. पोलिस विभागाच्या पुढाकाराबद्दल दिव्यांगांनी आनंद व्यक्त करीत पोलिस प्रशासनाचे आभार मानले.