अभिनंदन नीरज चोप्रानं इतिहास रचलाय….टोकियो ऑलम्पिकमध्ये जिंकले सुवर्ण पदक

511

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील पुरुष भालाफेक गटात इंडियन आर्मी मॅन नीरज चोप्रानं इतिहास रचलाय. पात्रता फेरीतील कामगिरीत आणखी सुधारणा करत त्याने यंदाच्या स्पर्धेत तमाम भारतीयांना सोनेरी क्षणाची अनुभूती देणारी कामगिरी केली. सर्वात लांब भाला फेकत त्याने टोकियो ऑलिम्पिकमधील पहिले आणि आतापर्यंतच्या इतिहासातील दुसरे गोल्ड मिळवून दिलय.

नीरज चोप्रा आणि जर्मनीचा जोहान्स वेट्टर यांच्यात चुरस पाहायला मिळेल असे वाटत होते. पण जर्मनीच्या खेळाडूसह अन्य कोणत्याही खेळाडूला त्याच्या जवळपासही भाला फेकता आला नाही. 2008 मध्ये अभिनव बिंद्राने शूटिंगमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळवून दिले होते. त्यानंतर भारताला वैयक्तिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारा नीरज चोप्रा हा दुसरा भारतीय खेळाडू ठरलाय.

पात्रता फेरीत टॉपर राहिलेल्या नीरज चोप्राने फायनल इवेंटमध्ये पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर भाला फेकला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने आणखी जोर लावत 87.58 मीटर भाला फेकून प्रतिस्पर्धांना आणखी मागे टाकले. तिसऱ्या प्रयत्नात 76.79 मीटर भाला फेकला. चौथ्या प्रयत्नात तो फेल त्याची भाला फेक फॉल ठरली.

2016 मध्ये ज्यूनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत नीरजने लक्षवेधी कामगिरी नोंदवली होती. 20 वर्षांखालील स्पर्धेत त्याने 84.48 मीटर भाला फेकला होता. ज्यूनिअर वर्गवारीतील त्याचा हा विश्वविक्रम आजही अबाधित आहे. त्यामुळेच त्याच्याकडून पदकाची आस होती. त्याने हा विश्वविक्रम रिओ ऑलिम्पिक कॉलिफिकेशनच्या शेवटच्या दिवशी नोंदवला होता. त्यामुळे मागील ऑलिम्पिकमध्ये तो ऑलिम्पिक खेळताना दिसला नव्हता. पण यंदा तो मैदानात उतरला आणि त्याने सुवर्ण स्वप्नपूर्ती साकार केली.