Home Breaking News सरस्वती सार्वजनिक वाचनालय कोंढाळा येथे बक्षीस वितरण सोहळा…

सरस्वती सार्वजनिक वाचनालय कोंढाळा येथे बक्षीस वितरण सोहळा…

407

-गौरव लुटे (आरमोरी ग्रामीण प्रतिनिधी)

वडसा: कोंढाळा येथील सरस्वती सार्वजनिक वाचनालय येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि विशेष म्हणजे नावीन्यपूर्ण उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा व भविष्यातील येणाऱ्या संधीचे सोने करण्याकरिता सरस्वती सार्वजनिक वाचनालय येथे विविध स्पर्धेचे आयोजन केले जाते.याच अनुषंगाने मुला मुलींना विरंगुळा मिळावा व आनंद वाटावा याकरिता चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निसर्ग हा विषय ठेवण्यात आला होता.स्पर्धेत मोठया संख्येने मुला मुलींनी भाग घेतला होता.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वाचनालयचे सचिव व नूतन जुनिअर महाविद्यालय अरुणनगर चे मुख्याध्यापक श्री.मा.भाऊरावजी पत्रे सर लाभलेले होते. उपाध्यक्षस्थानी सरस्वती वाचनालयचे सहाय्यक पदाधिकारी गिरीश भजनकर , प्रमुख पाहुणे म्हणून गौरव लुटे व वैष्णवी टिचकुले उपस्थित होते.
विजेत्यांचे मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले.
चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक सवि राकेश चौधरी, दुसरा क्रमांक पुष्कर सुनील पारधी आणि तृतीय क्रमांक अनुष्का ओमप्रकाश शेंडे या विद्यार्थ्यांनी पटकाविला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका ठाकरे, प्रास्ताविक संदीप ढोंगे आणि आभार प्रदर्शन सौरभ बुराडे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्याकरिता प्रियंका ठाकरे, गिरीश भजनकार, सौरभ बुराडे, संदीप ढोंगे, मदन पचारे, भूषण राऊत यांनी सहकार्य केले.

Don`t copy text!