ब्रेकिंग: रेल्वे रुळावर इसमाची आत्महत्या…

432

सिंदेवाही-शहरातील मदनापुर वार्ड येथील एका इसमाने जाटलापूर गाव परिसरात रेल्वे समोर येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात तो गंभीर जखमी होऊन त्याच्या एका पायाला गंभीर इजा झाली. सिंदेवाही पोलिसांनी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे दाखल करून प्राथमिक उपचार केला व त्यानंतर पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले परंतु प्रवासातच त्याचा मृत्यू झाला.

राकेश गणपतराव बोदनवार (40)असे मृतकाचे नाव आहे.
मृतक राकेश बोदनवार हा मानसिक रुग्ण असल्याचे बोलले जात आहे. त्याने यापूर्वी सुद्धा रेल्वेतून खाली उडी मारून जंगलाच्या दिशेने पळाला होता, त्यावेळी रेल्वे पोलिसांनी त्याचा शोध घेऊन घरी आणून दिले होते.

एकदा त्याने हातात विळा घेऊन पोलीस स्टेशनला जाऊन मी  माझ्या बायकोचा खुन करून आलो आहे,अशी बतावणी केली. पोलिसांनी लगेच घरी जाऊन चौकशी केली असता असा कोणताही प्रकार घडल्या नसल्याने त्याला समज देऊन घरी पाठविण्यात आले होते.मृतक मानसिक आजारी होता त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्याचे बोलले जाते.