घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरानी घराचा दरवाजा तोडून लाखो रुपयांचे दागिने केले लंपास…#मित्राच्या घरी वास्तुशांतीला जाने पडले महागात…

857

ब्युरोचिफ प्रशांत शाहा
देहुरोड (पुणे) : घरातील सर्व सदस्य आपल्या मित्राच्या घर वास्तुशांतिला गेले असता,या वेळी अज्ञात चोरानी घरफोडी करुण सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना देहुरोड येथील आदर्श नगर येथे रविवार दि.२० रोजी दुपारी दोन ते चार वाजेच्या दरम्यान ही घटना घडली.
उत्तम नंदकुमार लोनकर वय 33 वर्ष राहणार आदर्श नगर देहुरोड (पुणे) यानी आपल्या घरी झालेल्या चोरीची तक्रार सोमवार दि.२१ ला देहुरोड पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांन विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार फिर्यादि हे घराला लॉक करुण सर्व परिवार आपल्या मित्राच्या वास्तुशांति च्या कार्यक्रमा साठी गेले होते त्या दरम्यान च्या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दरवाज्याचे लॅच-लॉक कटावणीच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश करुण घरातील कपाटातुन १ लाख ६५ हजार ५०० रूपयांचे सोन्या-चांदिचे दागिने चोरुन नेले.
घटनेची पुढील तपास देहुरोड(पुणे)पोलीस करत आहेत.