राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय परिषद प्रथम वर्धापण दिन सपंन्न…

490

दि. ९ जून रोजी सायंकाळी आॅनलाईन माध्यमातून व फेसबुक लाईव्ह द्वारे मोठ्या उत्साहात राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेचा प्रथम वर्धापन दिन सोहळा आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहालय संस्था अहमदनगर चे डॉ.प्रा. गिरीष कुलकर्णी आणि शब्दसृष्टी मुंबई चे संस्थापक प्रा. मनोहर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुमित पवार होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. सौ. सुनिता जमणे यांनी केले. या प्रसंगी राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेचे अध्यक्ष प्रा. सुमित पवार सर यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व उपस्थित मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात कु. खुशी व कु. ख्याती मानमोडे यांनी यांनी शानदार व सुरेल आवाजात स्वागत गीत सादर करून केले. या प्रसंगी वर्षभर परिषदेने राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रम व प्रश्न मंजुषा, निबंध स्पर्धा, संविधान दिन, मतदार दिन, तसेच विभाग, जिल्हा परिषद निर्मिती करण्यात आली तसेच कोरोना काळात विद्यार्थ्यांना आॅनलाईन, नोट्स तसेच तज्ञ प्राध्यापक यांनी तयार केलेल्या व्हिडिओ, आॅडिओ दिल्या व विद्यार्थी, शिक्षक यांचा समन्वय साधण्यासाठी वर्षभरात प्रयत्न परिषदेकडुन करण्यात आले या बाबतची माहिती ध्वनिफितीचे या माध्यमातून दाखविण्यात आली. या ध्वनीफितीचे संचालन प्रा. सौ. हर्षदा दरेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे महासचिव डॉ. पितांबर उरकुडे यांनी केले. यावेळी प्रा.भगवान चौधरी, धुळे, प्रा.किसन माळोदे, चिखली, प्रा.प्रकाश निकम पुणे, बाबासाहेब चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व परिषदेतील तंत्रस्नेही प्राध्यापकांनी दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्माण करुन प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मिळाले त्याबद्दल त्यांचा शाब्दिक सत्कार करण्यात आला. कोरोना काळात नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परिषदेने शिक्षणाचा वसा घेतला त्या बद्दल डॉ. मनोहर सर यांनी परिषदेचे अभिनंदन केले. परिषदेचा अल्पावधीतच वेरुळ गगनावरी गेला याचा आनंद वाटला असेही ते मार्गदर्शन करताना म्हणाले. तर शिक्षकांना एकत्र करण्याचे काम परिषदेने केले. शिक्षकांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच मुलांना सामाजिक घडामोडींची जाणिव करुन द्यावी व समाजाचे नेतृत्व करणारी पिढी घडविण्याचे महान कार्य परिषदेने शिक्षकांच्या मदतीने करण्याचा सल्ला स्नेहालय संस्थेचे संस्थापक अहमदनगर चे डाॅ. गिरीष कुलकर्णी यांनी मार्गदर्शन पर मनोगतात मत व्यक्त केले. प्रा. सुमित पवार यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातुन राज्यशास्त्र परिषदेने मागील एक वर्षभरात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा व राबविण्यात आलेल्या विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचा आढावा सादर केला. व नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांची नेमणूक केली. या कार्यक्रमाला राज्यशास्त्र परिषदेचे पदाधिकारी सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष,सचिव व सर्व सदस्य या आॅनलाईन सभेस उपस्थित होते. प्रा. शरद जोगी सर यांनी आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर कार्यकारिणीने परिश्रम घेतले.