महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन किंवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित कराव्यात- अजित प्रकाश संचेती

431

ब्युरोचिफ प्रशांत शाहा
पिंपरी चिंचवड पुणे:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र मध्ये सगळी कडे जास्त प्रमाणात वाढत आहे त्या मध्ये आता म्युक्रोमायकोसिस चा उद्रेक झालेला आहे त्याची झळ जशी सर्वसामान्य बसत आहे तशीच ती वैद्यकीय विद्यार्थी व डॉक्टरांना ही बसत आहे,
अनेक विद्यार्थी कोरोनाबाधित आहेत काही विध्यार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य बाधित आहेत आणि काही विद्यार्थीना आपले प्राण गमवावे लागले आहेत,आता सरकारने कुठे महाराष्ट्र अनलॉक प्रकियेस सुरवात केली आहे यात लोक खूप प्रमाणात बाहेर पडण्यासाठी सुरवात होईल आणि त्यात अजून कोरोना चा प्रसार वाढू शकतो म्ह्णून 10 जून च्या होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा तात्पुरत्या पुढे ढकलण्यात याव्या तरी आपण या परीक्षा आता पर्यंत चार वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत,यामुळे विद्यार्थ्यांनाचे नुकसान होऊ नये म्ह्णून आपण योग्य ते नियोजन करून परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात किंवा शक्य नसल्यास त्या तात्पुरत्या स्वरूपात स्थगित कराव्यात असे निवेदन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांना भारतीय राष्ट्रवादी पार्टी चे संपर्क प्रमुख अजित संचेती यांनी दिले