Home Breaking News रेगडी येथील दीना विश्रामगृहाची दुर्दवस्था; दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी…

रेगडी येथील दीना विश्रामगृहाची दुर्दवस्था; दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी…

867

जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली:
गडचिरोली जिल्ह्यातील केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या रेगडी या गावात सण 1973 ते 1974 साली कर्मवीर कन्नमवार जलाशय(दीना धरण)यांच्या नेतृत्वात रेगडी या गावात विश्रामगृह बांधण्यात आले होते.
परंतु सण 2006 च्या दरम्यान नक्सलवाद्यांकडून या विश्रामगृहाची जाळपोळ करण्यात आली होती.
आज या कृत्याला पंधरा ते सोळा वर्ष लोटूनही या विश्रामगृहाकडे कोणतेचे मोठ्या अधिकारी किव्हा मोठे राजकीय नेते लक्ष दिलेले नसल्याचे दिसून येत आहे.

विशेष बाब अशी की रेगडी येथे दिनाधरणावर वनविभागाने पार्क उभारले आहे.या पार्कला व कर्मवीर जलाशयाला रोज हजारोच्या संख्यात पर्यटक भेट देत आहेत व अनेक पर्यटक व परिसरातील नागरिक या दिनाच्या विश्रामगृहाची दुरुस्ती व नूतनीकरण करावी अशी मांगणी करत आहेत.

या संदर्भात रेगडी येथील नागरिक क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी व बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शाहा यांच्या कडे मांगणी केली आहे. यावेळी रेगडी येथील माजी सरपंच बाजीराव गावडे,उपसरपंच रमेश दयालवर,बाजीराव तलांडे,प्रशांत शाहा,कोतू पोटावी,तोंदेश तलांडे,उमेश मल्लिक,आकाश कुळमेथे व आदी गावकरी उपस्थित होते.

Don`t copy text!