चिमूर येथे कारच्या धडकेत ०३ वर्षीय बालकाचा मृत्यु….

0
333

चिमूर- चिमूर शहरातील मासळ रोडवरील वाल्मिकी चौकात आज दुपारी २:०० वाजताच्या सुमारास एका कारच्या अपघातात धीरज शंकर भानारकर वय ३ वर्ष या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

चिमूर येथील वाल्मिकी चौक समोरील गुरुदेव वार्डात चार चाकी वाहन एम एच ३४ एम ९३५५ या फोर्ड एकोस्पोर्ट मासळ कडून चिमूर कडे येत असताना वाल्मिकी चौकात अपघात झाला असून यात धीरज उर्फ बबलू शंकर भानारकर वय ३ वर्ष ला वाहनाने धडक दिली. यात मुलगा वाहन खाली आल्याने मृत झाला. सदर वाहनात चालकासह दोन व्यक्ती असल्याचे प्रत्यक्ष दर्शीनी सांगितले. सदर लहान मुलास उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरानी मृत घोषित केले.
चिमूर पोलीस यांनी वाहन चालक सिटू उर्फ सतीश सिद्धार्थ इंदूरकर यास ताब्यात घेतले असून कारवाई करीत आहे.

शंकर भानारकरला दोन लहान मुले असून तो नगर परिषद मध्ये सफाई कामगार आहे त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here