पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त; गुन्हे लपविण्याचा आरोप…

0
322

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. वडेट्टीवार यांच्यावर गुन्हे लपवल्याचा आरोप आहे. भाजपचे माजी आमदार मितेश भांगडिया यांनी तक्रार केली होती. त्यात त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी आपल्यावर असणाऱ्या क्रिमिनल केसेस लपवल्या असल्याचा आरोप केला होता. भांगडिया यांनी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांपासून ते पासपोर्ट ऑफिसपर्यंत तक्रार केली होती. नंतर कारवाई झाली नाही तेव्हा ते हायकोर्टात गेले.

माहितीनुसार विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा पर्मनंट अॅड्रेस दिला होता. तिथल्या पोलीस स्टेशनमधून एनओसी घेतली होती.त्यात त्यांच्यावर कुठेही केसेस सुरू नाहीत. त्यामुळं भांगडिया कोर्टात गेले. त्यावेळी कोर्टाने पासपोर्ट ऑफिसला नोटीस काढल्या. त्यानंतर पासपोर्ट कार्यालयाने विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त केला असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here