Home Breaking News अबब! गेल्या ६७ वर्षांपासून या गावात होते बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक...

अबब! गेल्या ६७ वर्षांपासून या गावात होते बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक…

सोलापूर: राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एक असे गाव आहे की, या गावाला 67 वर्षाची निवडणूक बिनविरोध परंपरा कायम राहिली आहे. माढा तालुक्यातील निमगाव (टे. ) या ग्रामपंचायतीने 67 वर्षापासून एकही निवडणूक पाहिली नाही.या मुळे राज्यांमध्ये निमगाव ही आदर्श ग्रामपंचायत ठरत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव (टे ) गाव आहे. दिवंगत विठ्ठलराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 67 वर्षांपूर्वी निमगाव (टे ) ग्रामपंचायत स्थापन झाली. त्यानंतर आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय मामा शिंदे यांच्या यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत कारभार यशस्वीरित्या झाला आहे. गावामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार हा ज्येष्ठ मंडळी ठरवतात. गावातील प्रत्येक प्रभागाचा आरक्षणानुसार एकमताने उमेदवार दिला जातो. ना कसली स्पर्धा ना कुठला वाद. निमगाव या गावातून आजपर्यंत एकही पोलीस तक्रार नोंद नाही. गावातील जेष्ठ मंडळींकडून गावातील तंटे मिटले जातात. गावातील विकासाबाबत पाणी, रस्ते, आरोग्य सुविधांबाबत गाव विकासाचे मॉडेल आहे.

गावातील प्रत्येक युवकाला नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. गावातील शाळेला एक आदर्श शाळा म्हणून पुरस्कार प्राप्त आहे. निमगाव टें गाव आर्थिकदृष्ट्या सधन असलेले गाव, उजनी, सीना माढा योजनेच्या पाण्यामुळे बागायती भाग आहे. अस असल तरी निमगाव व्यसनमुक्त गाव आहे. गावात ग्रामस्थांच्या सोयी साठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. पहिलीपासून महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची सोय याठिकाणी केली आहे. गावात प्रत्येक कुटुंबाला आर ओ पाणी दिलं जातं.

गावचा परिसर सुंदर आणि स्वच्छ आहे. निमगाव गावामध्ये तीन हजार लोकसंख्या असणारे गाव आहे. एकूण अकरा सदस्य असणारी ग्रामपंचायत आहे गावांमध्ये विविध जाती व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. निमगाव या ग्रामपंचायतीला राज्य शासनाचे अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. अनेक गावांमध्ये निवडणूक बिनविरोध व्हावी, म्हणून प्रयत्न केले जातात. मात्र त्यांना त्यात यश येताना दिसत नाही. मात्र 67 वर्षापासून निमगाव या गावात बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम आहे. त्यामुळे गावात सुख आणि शांतता नांदते आहे.

बिनविरोध झालेल्या निवडणुकीमध्ये गावातील युवकांनी मोठी जबाबदारी दिली आहे. यापुढील काळात गावाला आदर्श बनवण्याचे काम करणार आहे. गावात प्रामुख्याने आरोग्य आणि सामाजिक विषयांवर भर देणार आहे. गावाला विकासाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करणार आहे. गावातील बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राहिली आहे. यामुळे गावाच्या विकासाची मोठी जबाबदारी असणार आहे. यापुढील काळात क्रीडा क्षेत्रात मोठा विकास करण्याचे स्वप्न आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

ब्रेकिंग: बिबट्याच्या हल्यात बालिका गंभीर जखमी…दुर्गापूर परिसरातील घटना…

चंद्रपुर: आज रात्रौ ८:३० वाजता दुर्गापूर येथील वॉर्ड क्रमांक 1 येथील कु. आरक्षा जगजीवन कोपुलवार बाहेर अंगणात खेळत असताना बिबट्याने पकडल्याने ती गंभीर जखमी...

टायगर ग्रुप च्या सदस्यांनी बुजवले खड्डे..! महाराष्ट्र सरकार आणि त्रिवेणी कंपनीच्या निषेधार्थ टायगर ग्रुपचे सदस्य रस्त्यावर

आल्लापल्ली : सुरजागड लोह खनिज प्रकल्पातील ओव्हरलोड ट्रकान मूळे रस्त्यावर मोठ-मोठ्या खड्डे झाले आहे त्या खड्ड्यानं मुळे रोज अनेक अपघात होत आहेत आणि अपघातांची...

गोंडपिपरी तालुक्यांतील अडेगांवसह चेकदरूर दरूर धामणगांव येथे विजेचा लपंडाव. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची गांवकराची मागणी

-शरद कुकूडकार भंगाराम तळोधी प्रतिनिधी गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यात अडेगांवसह चेकदरूर दरूर धामणगांव येथे परीसरात विघुत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. दररोज पधरा मी ते...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विठ्ठलवाडा-आष्टी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे.. ए.जी कंन्ट्रक्शनच्या कामाची चौकशी करा-शिवसेनेची मागणी

गोंडपिपरी - गोंडपिपरी तालुक्यात सर्व बाजूने रस्त्याच्या बांधकामाचा धडाका सुरू आहे.अशातच तालुक्यातील विठ्ठलवाडा ते आष्टी मार्गाच्या रस्त्याचे अंदाजे ४५ कोटी रुपयांचे बांधकाम ए. जी...

101 सुरक्षा रक्षक सिएसटिपीएस मध्ये होणार पुर्ववत रुजु…आ. किशोर जोरगेवार यांनी घडवून आणली कामगार मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक…

चंद्रपुर: आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्याचा पाठपुरावा आणि प्रयत्नांनतर सिएसटीपीएस येथील नोंदणीकृत 101 सुरक्षा रक्षकांची नौकरीसाठी सुरु असलेली सहा वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे....

एसटी महामंडळ बसच्या धडकेत युवक ठार…गडचांदूर जवळील घटना…

राजुरा: राजुरा कोरपना आदिलाबाद जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 ब हा अपघात प्रवण महामार्ग झाला असून दोन दिवसांपूर्वी राजुरा येथील महिला प्राध्यापिका वनिता चिडे...

बेलतरोडी अग्नितांडवातील पीडितांना 15 ताडपत्री धम्मदान.. ‘द डिवाईन ग्रुप‘चा अभिनव उपक्रम

नागपूर : गेल्या आठवडयात बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सिलिंडरच्या विस्फोटातील भिषण आगीत शेकडो झोपडया भक्ष्यस्थानी झाल्याने हजारो नागरिक उघडयावर पडले. सोमवारी महाकारूणीक तथागत...

Recent Comments

Don`t copy text!