Advertisements
विक्की दुपारे (बल्लारपूर प्रतिनिधी)
बल्लारपूर: आज सकाळी १०:३० वाजता बल्लारपूर येथील भगतसिंग वार्डमध्ये राहणारी आफ्रीन फुरखान शेख आपल्या घरी एकटी खेळत होती. ही संधी बघून एक युवक घरच्या मागच्या भिंतीवरून चढून घरात घुसला. त्यानंतर त्याने आफ्रिनला उचलून दुसऱ्या युवकाकडे दिले आणि दोघेही युवक त्या मुलीला गाडीवर बसवून पळून गेले. युवकांनी तिला घट्ट पकडून ठेवले होते पण चिमुकलीने संधी बघून दुसऱ्या मुलाच्या हाताला चावा घेऊन तिथून त्या नराधमांपासून तिने स्वतःची सुटका करून घेतली. धावत-धावत ती एका दुकानांमध्ये जाऊन लपली. तिथून आपल्या घरच्यांना फोनवर संपर्क साधून बोलाविले. त्यानंतर तिचे घरचे त्या चिमुकलीला घेऊन बल्लारपूर पोलीस स्टेशन येथे जाऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. पुढील तपास बल्लारपुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उमेश पाटील करीत आहेत.
Advertisements
Advertisements
Advertisements