Homeकृषीशेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषी सल्ला...

शेतकऱ्यांना हवामान आधारीत कृषी सल्ला…

शेखर बोनगीरवार

चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर : चंद्रपूर जिल्हयात दिनांक ३० डिसेंबर २०२० ते ०३ जानेवारी २०२१ या पाच दिवसात आंशिक ढगाळ ते निरभ्र हवामान राहून कमाल तापमान २८.५ ते २८.९ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १३.८ ते १४.३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हरभरा -वाढीची अवस्था

१. घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे शेतामध्ये लावावे.

२.घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (१-२ प्रती मिटर ओळ किंवा ५ टक्के किडग्रस्त घाटे) पार केल्यास नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निबोंळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडीरेक्टीन प्रती ५० मि.ली. किंवा एच.ए.एन.पि.व्ही.(१X१०९) पिओबी/मिली) ५०० एल.ई/हे. किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के इसी २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

कापूस- बोंडे अवस्था

१.कपाशीचे फुटलेले बोन्डेची वेचणी ३१ डिसेंबर पूर्ण करून ते सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिवळसर, किडका, कवडीयुक्त तसेच पावसात भिजलेला कापूस वेगळा वेचून अलग साठवावा. वेचणी करतांना कापसाला पालापाचोळा चिकटणारा नाही याची काळजी घ्यावी.

२.गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापणासाठी कापसाची वेचणी झालेल्या क्षेत्रात खोडासह समूळ झाडाची काढणी करून खोल नांगरट करावी व काढलेल्या प-हाटया जाळून नष्ट करावे.

उन्हाळी धान – पूर्वमशागत नर्सरी आणि बीजप्रक्रिया

१.धान रोपवाटीकेत पेरणीनंतर १५ दिवसांनी तण/कचरा काढून टाकावे व नंतर दर गुंठयास एक किलो युरिया दयावा.

२.रात्रीच्या वेळेस घटलेल्या तापमानाचा भात पिकाच्या रोपांच्या वाढीवर होणा-या विपरीत परिणाम टाळण्यासाठी रात्रीच्या वेळेस प्लास्टिक आच्छादन किंवा भाताचा तनसाचे आच्छादन टाकावे व सकाळी काढून घ्यावे जेणेकरून भाताच्या रोपांची वाढ चांगली होईल.

३.रोपवाटिकेवर करपा व कडाकरपा रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम + स्ट्रेफ्टोसायक्लीन ०.५ ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून लागवडीनंतर १० दिवसाच्या अंतराने दोन ते तीन फवारण्या कराव्यात.

४.उन्हाळी धान पिक रोपवाटीकेसाठी जमीन नांगरून व वखरून तयार करावे १०० से.मी. रूंद व १० ते २५ सें.मी उंच, योग्य त्या लांबीचे गादीवाफे तयार करून धान बियाणे पेरणीपूर्वी दर गुंठयास तीन क्विंटल चांगले कुजलेले शेणखत, १ किलो युरिया व ३ किलो एस.एस.पी. मिसळून दयावे.

५.संशोधीत धान वाणांचा वापर करावा. पेरणीसाठी बारीक जातीकरिता ३५ ते ४० किलो आणि मध्यम व ठोकळ जातीकरीता ५० किलो प्रति हेक्टरी बियाणे वापरावे.

६.धान बियाणे पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी, त्यासाठी १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ (३ टक्के) या प्रमाणात द्रावण तयार करून त्यात बियाणे टाकावे, द्रावण स्थिर झाल्यावर तरंगणारे हलके रोगयुक्त बियाणे चाळणीने काढून जाळून टाकावे, व तळाखालील निरोगी बियाणे २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवून सावलीत २४ तास वाळवावे, पेरणीपूर्वी बियाण्यास (३ ग्रॅम/किलो) बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी

 

तूर – फुले व शेंगा अवस्था

शेंगा पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी पिक ५० टक्के फुलावर आल्याबरोबर पहिली फवारणी क्विनॉलफॉस २५ टक्के इसी १६ मि.ली. त्यानंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी इमामेक्टिन बेन्झोएट ५ टक्के एसजी ३ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

गहु-पेरणी-

१.ढगाळ हवामानामूळे गव्हावरील मावा किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तरी त्याच्या नियंत्रणासाठी थायोमिथाक्झाम २५ टक्के डब्ल्यूजी १० ते १५ ग्रॅम किंवा क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही इसी ४० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२.उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास पाण्याच्या उपलब्ध साठयानुसार पिकाच्या गरजेनुसार ओलीत करावे. आवश्यकतेनुसार एक ते दोन निंदणी करून पीक तणविरहित ठेवावे.

३.गहु पिकाला पेरणीनंतर १८ ते २० दिवसांनी नत्र खताची दुसरी मात्रा (५० ते ६० किलो प्रती हेक्टरी) पहिल्या पाणी देतांना दयावी.

करडई –वाढीची अवस्था

१.पेरणीनंतर ३०, ५० आणि ६५ दिवसांनी ओलिताच्या तीन पाळया दयाव्या. जेथे एकाचा ओलिताची सोय आहे. तेथे ५० दिवसांनी, दोन ओलिताची सोय असल्यास ३० व ५० दिवसांनी ओलीत करावे. ओलीत करतांना पिकात जास्त वेळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

२.करडई पिकाच्या पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी विरळणी करून दोन रोपात २० ते ३० सें.मी. अंतर ठेवावे आवश्यकतेनुसार १ ते २ वेळा निंदणी व डवरणी करावी.

३.मावा किडीचा प्रादुर्भाव (३० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे) आढळताच डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १३ मि. ली. प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

मिरची-फुले ते फळ

चुरडा मुरडा रोगाच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ३० ईसी १४ मिली किंवा फिप्रोनील ५ एससी २० मिली किंवा इथीओन ५० ईसी ४० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

टिप- रासायनिक तणनाशक व किटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहूनच करावी. फवारणी करताना संरक्षक किटचा वापर आवश्य करावा.

असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उदय पाटील व कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही व यांचे मार्फत करण्यात येत आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!