आणि तो कायमचाच झोपी गेला..!

0
1227

गोंडपिपरी (सुनील. डी. डोंगरे )–कार्यकारी संपादक

Advertisements

पत्नी डिलिव्हरी साठी माहेरी गेलेली .डिलिव्हरी होऊन मुलगी झाल्याची खबर त्याला दिली गेली .दोन तीन दिवस सारखा तो ‘ख़ुशी ‘मनवत होता ..!रात्री झोपण्यासाठी तो वरच्या माळ्यावरील आपल्या खोलीत गेला अन काय झाले कुणास ठाऊक तो कायमचाच झोपी गेला कधीही नं उठण्यासाठी ….
यासंदर्भात असे की ,जुन्या बस स्टॅन्ड नजीक राहणाऱ्या प्रवीण पुद्गटवार याची ही करुण कहाणी आहे .त्याची पत्नी दुसऱ्या डिलिव्हरीसाठी माहेरी गेली .नुकतीच डिलिव्हरी होऊन त्याला कन्यारत्न प्राप्त झाले .(एक मुलगा आहे त्याला )
मुलगी झाल्याची खबर त्याला देण्यात आली .मुलावर मुलगी झाल्याचा आनंद त्याला बहुदा झाला असावा !त्याने दोन तीन दिवस सातत्याने ‘एन्जॉय ‘केल्याचे कळते ..!
तो आपल्या फॅमिलीसह वरच्या माळ्यावर वास्तव्यास असतो .पत्नी माहेरीच आहे .तो रात्री झोपण्यासाठी वरच्या खोलीत गेला .सकाळ झाली तरी तो उठला नसल्याचे लक्षात आल्यावर घरच्या लोकांनी वर जाऊन त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो मृतावस्थेत आढळून आला .
दोन तीन दिवसापूर्वीच जन्मलेल्या मुलीला आपल्या पित्याचे मुखही बघता आले नाही .तरुण मुलगा अशा पद्धतीने जगातून गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे .

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here