HomeBreaking Newsदादा असावा तर असा भारी...हेलिकॉप्टरने बहिणीला आणले माहेरी...

दादा असावा तर असा भारी…हेलिकॉप्टरने बहिणीला आणले माहेरी…

जळगाव: लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी येणाऱ्या मुलीचे जळगाव शहरातील एका परिवाराने जंगी स्वागत केलं आहे. कावडीया कुटुंबातील शिवानी अशोक कावडीया हिचा विवाह सोहळा परळी वैजनाथ येथील डॉ. कुणाल यांच्यासोबत नुकताच संपन्न झाला. लाडकी बहिण लग्नानंतर पहिल्यांदाच तिच्या पतीसोबत माहेरी येणार म्हणून तिचा भाऊ विराज याने हटके स्वागत करायचे ठरवले होते. त्यासाठी तो परळी येथे चक्क हेलिकॉप्टर घेऊन गेला आणि त्याने बहिणीला आश्चर्याचा धक्का दिला.

हे हेलिकॉप्टर जळगाव येथील कै. बॅरिस्टर निकम चौक मैदानावर (सागर पार्क) उतरविण्यात आले. शिवानीचे माहेरी झालेले भव्य स्वागत पाहून ती भारावून गेली. तिच्या स्वागतासाठी आप्तेष्ट आणि नातेवाईक हजर होते.

सदर कार्यक्रम सुरुवातीला जळगाव विमानतळावर नियोजित करण्यात आला होता, परंतु विमानतळावरील धावपट्टीवर कारपेंटिंगचे काम सुरु असल्याने विमानतळ प्रशासनाकडून नकार देण्यात आला. यावर मार्ग काढत सर्व शासकीय परवानग्या घेऊन सागर पार्कवर हेलिपॅड तयार करून हेलिकॉप्टर तिथे उतरविण्यात आले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!