ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव तालुक्यातील अमानवाडी येथे शांतता समितीची सभा संपन्न.

357

अजय चोथमल
प्रतीनिधी मेडशी

मालेगाव तालुक्यातील जऊळका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम अमानवाडी येथे शुक्रवारी शांतता समितीची बैठक पार पडली. जऊळका स्टेशनचे ठाणेदार एपीआय अजिनाथ मोरे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करून ६ डिसेंबर व आगामी काळात येणारे सण उत्सव शांततेत पार पाडावे असे आव्हान केले.

तसेच कोरोना काळात नागरिकांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता येणाऱ्या सण-उत्सव सामाजिक अंतर राखून साजरे करावे असे आवाहन केले. तसेच कायदा मोडणाऱ्या ची गय केली जाणार नाही असे ते म्हनाले.

यावेळी जऊळका पोलीस ठाण्याचे ठाणेदार आजिनात मोरे, नापोकॉ सय्यद अनीस .रंगराव ईखार (पोलिस पाटील) नंदाताई गणोदे (महिला कॉंग्रेस कमेटी अध्यक्षा वाशीम) श्री.भगवान तात्या गणोदे(तंटामुक्त समिती अध्यक्ष) श्री.गणेश घाटोळे(उपसरपंच) श्री.राजेश गणोदे आदी गावकर्‍यांची व शांतता समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती