नांदगाव मार्गे येणारी दारु गोंडपिपरी पोलिसांनी पकडली

0
473

दारू सह ७८ हजाराचा मुद्देमाल जप्त

गोंडपिपरी / आकाश चौधरी

गोंडपिपरी तालूक्याला पोंभुरणा तालुक्याची सिमा लागून आहे.सीमेवरील भागात कायदा व सुव्यवस्था हाताळण्याची जबाबदारी पोंभुरणा सह मूल तालुक्यातील उप पोलीस स्टेशन बेंभाळ पोलिसांवर आहे.या नक्षलग्रस्त व संवेदनशील परिसरातुन दररोज मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने गोंडपीपरी तालुक्यात दारूची तस्करी होत असते व धडक कारवाई सुद्धा सद्यस्थितीत गोंडपीपरी पोलीस करीत आहे.गुरुवारी दि ३ ला दुपारच्या सुमारास गुप्त माहितीच्या आधारे गोंडपीपरी वढोली रस्त्यावर गोंडपीपरी पोलिसांनी नाकाबंदी लावून मोहाडा येथून फुरडी हेटी ला दारू तस्करी करताना दुचाकीसह सह ७८ हजाराचा दारू सह मुद्देमाल जप्त करीत वसंत बोण्डे,सतीश निखाडे,सागर मडावी या तीन आरोपींना अटक केली.
सदर कारवाई पोलीस स्टेशन गोंडपीपरी चे ठाणेदार संदिप धोबे यांच्या मार्गदर्शनात नासिर सय्यद, शांताराम पाल,कोंडेकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here