देसाईगंज तालुक्यातील ५२ कुटुंबांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले

600

तालुका प्रतिनिधी/ सतीश कुसरामग ( गडचिरोली )

काल देसाईगंज तालुक्यातील सावंगी, धरमपुरी येथील ५२ कुटुंबाना तात्काळ स्थानिक प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले.

गडचिरोली जिल्हयात वैनगंगा नदीकाठी पूरस्थिती – वडसा, आरमोरी, मार्कंडा,अहेरीसह सिरोंचा भागात सर्तकतेचा इशारा

गोसेखुर्द धरणातील पाण्याच्या अधिक विसर्गामूळे जिल्हयातील पाच प्रमुख मार्ग बंद
1. गडचिरोलीहून नागपूरकडे जाणारा आरमोरी जवळील पाल व गाढवी नदीच्या पुलावर पाणी

2. गडचिरोली ते चामोर्शी यात शिवणी व गोविंदपूर नाला

3. आरमोरी ते रामदा रस्ता- गाढवी नदीवरील पूल

4. आष्टी गोंडपिंपरी रस्ता

5. आरमोरी ते ब्रह्मपुरी रस्ता

6. अहेरी – व्यंकटापूर येथील गडअहेरी नाला

आज सकाळी 8 वा. गोसेखुर्द धरणाच्या 23 गेटमधून 27988 क्यूमेक्स एवढा विसर्ग सुरू आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा/प्राणहिता/गोदावरी पात्रात अनुक्रमे पाणी पातळीत वाढ होत राहणार आहे.

भविष्यात गोसेखुर्द मधून आणखी विसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, सबब सर्व संबधीत प्रशासकीय यंत्रणेने तत्पर रहावे अशा सूचना जिल्हाधिकारी गडचिरोली यांनीं दिले आहे.

नदिकिनारी असलेले सर्व गावांनी व नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी उचित काळजी घ्यावी असे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.