Advertisements
Home Breaking News पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्याचे कार्य बचाव पथकामार्फत सुरू

पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहचविण्याचे कार्य बचाव पथकामार्फत सुरू

नागपूर, दि. 29 : नागपूर जिल्हयात आज 81.43 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली असून नवेगांव खैरी व तोतलाडोह प्रकल्पाचे अनुक्रमे 16 व 14 दरवाजे उघडण्यात आले आहे. आज (दि.29 ऑगस्ट) रोजी दुपारी 4 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार नवेगांव खैरी प्रकल्पातून सरासरी 6839 क्युमेक व तोतलाडोह प्रकल्पातून 6693 क्युमेक पाण्याची विसर्ग होत असून एकूण 25 गावांना पुराचा विळखा पडला आहे. त्यामुळे 2 हजार 907 कुटुंबांतील 11 हजार 64 व्यक्ती बा‍धित झाले आहेत.

Advertisements

मौदा तालुक्यातील मौदा शहर, चेहाडी, सुखडी, नेरला, किरणापूर, कुंभारपूर, सिंगोरी, झुल्लर तसेच वडना ही 9 गावे बाधित झाली आहे. यापैकी 364 कुटुंबांची पुराच्या पाण्यातून सुटका करण्यात आली आहे. 1 हजार 568 व्यक्तींना माथनी खाजगी शाळा, जनता हायस्कुल मौदा, ऑक्सफोर्ड स्कुल, जिल्हा परिषद शाळा व नरसाळा या सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच एसडीआरएफ (राज्य आपत्ती निवारण दल) व एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती प्रतीसाद दल) यांची सेवा घेण्यात आली आहे.

कामठी तालुक्यातील गोराबाजार, सोनेगांव, अजनी, भामेवाडा, जुनी कामठी, बिना, नेरी तसेच बिडबिना ही 8 गावे बाधित झाली आहे. गोराबाजार येथील 150 कुटुबांतील 620 व्यक्तींची सेंट जोसेफ शाळेत निवासाची व्यवस्था करण्यात आली. सोनेगाव येथील 80, अजनी 50, भामेवाडा 50, जुनी कामठी 40, बिडबिना 8 तर नेरी येथील 15 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. बिना येथील 1 हजार 500 कुटुंबापैकी 250 ते 270 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. येथे एसडीआरएफ व एनडीआरएफ यांच्या मदतीने बचाव पथकाचे कार्य सुरू आहे.

पारशिवनी तालुक्यातील काळाफाटा, पिपरी, जुनी कामठी, सिंगारदिप, सालई मावली तसेच पाली ही 6 गावे बाधित आहेत. येथील 380 कुटुंबातील 1 हजार 574 बाधित नागरिकांचे शाळा व समाजभवन येथे स्थलांतरण करण्यात आले आहे.

कुही तालुक्यातील चिचघाट तसेच आवरमारा या 2 गावातील 270 कुटुंब बाधित आहे. त्यापैकी 200 कुटुबांतील 1 हजार व्यक्तींना आतापर्यत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. उर्वरित कुटुबांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम बचाव पथकामार्फत वेगाने सुरू आहे. एसडीआरएफ व एनडीआरएफ यांच्या सेवेसह आर्मीचे पथक बचाव कार्य करीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिली.

*****

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

शिक्षकांच्या न्याय, हक्कासाठी महाविकास आघाडी प्रयत्नशील – माजी मंत्री वडेट्टीवार

सिंदेवाही : जुनी पेन्शन योजनेसह शिक्षकांच्या हक्काच्या अनेक मागण्या आजही प्रलंबित आहेत. या रास्त मागण्यांना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडीने शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांना घेऊन वेळोवेळी...

फारेस्ट ग्राउंड मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार

आलापल्ली : आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त आल्लापल्ली येथील फारेस्ट ग्राउंड(क्रिडा संकुलंन) या ठिकाणी आज ठीक ७:३० वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आले. ध्वजारोहणाचा कार्यक्रमाकरिता ग्रामपंचायत...

मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेतील शिक्षकाकडूनच अवयवदान

नागपूर: उद्याचे आदर्श नागरिक घडवित असताना एका शिक्षकाने मरणानंतरही अवयवदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. सुरुवातीला करोना व त्यानंतर विविध कारणाने मूत्रपिंड उपलब्ध न झाल्याने वणीतील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अभिनंदन! पुजा डोंगेची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय वूशू स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर (कोरपना) : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन वूशू स्पर्धेत कवठाळा या छोट्याश्या गावातून कठीन परिश्रम घेत खेळाडू कु. पुजा गणपत...

गोंडवाना विद्यापीठ सभागृहाच्या “डीडोळकर’ नामकरणाला स्थगिती

: माजी मंत्री वडेट्टीवारांच्या पत्राची गंभीर दखल गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला स्व.दत्ता डिडोळकर नाव देउन आदिवासी समाजातील थोर हुतात्मे तथा आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा ठराव...

महिलांनी सक्रिय राजकारणात भाग घेऊन सत्याच्या बाजूने उभे व्हा : नम्रता ठेमस्कर

घुग्घूस : येथील तुकडोजी नगर वॉर्ड क्रं 06 येथे सौ. पदमा राजूरेड्डी यांच्या वतीने हळदी - कुंकू व वाण वाटप कार्यक्रम 28 जानेवारी रोजी...

व्यसनाधीन मद्यासक्ताच्या कुंटुबियांना आनंद व सुखाचे जीवन मिळावे यासाठी अँलअँनाॅन परिवार समुह करीत असलेले प्रयत्न समाजासाठी भूषणावह… -प्रा.शाम धोपटे

श्याम म्हाशाखेत्री (चंद्रपूर जिल्हा संपादक) चंद्रपूर- अँलअँनाॅन परिवार समुह या आंतरराष्ट्रीय संगतीचा भाग असलेल्या "सुप्रभात अँलअँनाॅन परिवार समुह चंद्रपूर येथे स्थापन होऊन चार वर्ष पूर्ण...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!