HomeBreaking Newsमहाड मधील तारिक गार्डन इमारतीच्या बिल्डरसह इतर दोषींवर गुन्हा दाखल

महाड मधील तारिक गार्डन इमारतीच्या बिल्डरसह इतर दोषींवर गुन्हा दाखल

 

रोहा .रायगड, प्रतिनिधी गणेश तडसे

रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील काजळपुरा परिसरात असलेली तारिक गार्डन ही 5 मजली इमारत सोमवार,दि.24 ऑगस्ट राेजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळली. या पार्श्वभूमीवर या इमारतीचा बिल्डर तसेच अन्य संबंधित दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याचे दिसत आहे.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील शहरातील तारिक गार्डन ही इमारत कोसळल्यानंतर पालकमंत्री कु.आदिती तटकरे तातडीने घटनास्थळी पोहोचल्या,
तसेच विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ हेही तातडीने घटनास्थळी रवाना झाले.
या दूर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून अन्य 7 जण जखमी झाले आहेत.
दुर्घटनेतील . इमारतीच्या बिल्डरवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार संपर्क साधून आहेत. दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना त्याचप्रमाणे जखमींना योग्य ती शासकीय मदत देण्यात येणार आहे, यासाठी तातडीचे प्रयत्न सुरू करण्यात आले असून दुर्घटनाग्रस्तांची संपूर्ण जबाबदारी शासन घेणार आहे.
कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अद्यापही 26 लोक अडकले असून त्यांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ ची पथके श्वानपथकाच्या मदतीने युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य सुरू आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!