खरारपेठ येथील युवकाचा खड्ड्यात पडून मृत्यू 

0
191

 

चंद्रपूर प्रतिनिधी /कैलास दुर्योधन

गोंडपिपरी :

गोंडपिपरी तालुक्यात अंतर्गत येत असलेल्या खरारपेठ येथील युवकाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 20 ला सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आल्याने गावाच्या परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .

प्रणय भाऊजी तोरे खरारपेठ वय 23 सोमवार पासून बेपत्ता होता घरच्यांनी शोधाशोध केली असता काही पता न लागल्याने मंगळवारी गोंडपिपरी पोलिसात तक्रार दाखल करून पोलिसांनी मोबाईल चे लोकेशन च्या आधारे शोध घेतला असता साई नगर जवळ असलेल्या स्वतःच्या शेतातील अंदाज 12 फुट खोल खड्ड्यात पडून मृत्यू झाला.

प्रणय चा मोबाईल शेतातील प्लास्टिक मध्ये एका गुंडात ठेवला होता त्यामुळे प्रणय नि आत्महत्या केलि असावि असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याच्या पश्चात आई ,वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे पुढील तपास गोंडपिपरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार संदिप धोबे याच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी पोलिस तपास करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here