गोंडपिपरीच्या दोन पोलीस शिपायांची बातमीदासोबत अरेरावी

0
158

आकाश चौधरी/ गोडपिपरी-

 

गोंडपिरी शहरात पोळा निमित्ताने पोलीसांची गस्त होती. ऐवढ्यात धाबा मार्गाने दारु येत असल्याची माहीती त्या पोलीसांना ऐक बातमीदार देतो. तेव्हा त्यातिल दोन पोलीस शिपाई बातमीदाराला तु सांगितले म्हणून आम्हि जानार का ? तु कोन ? अशी धमकी देत तु लवकर नीघून जा असे अरेरावी केलेत. व बातमीदार असल्याचे समजताच तिथून क्षणाचाही विलंब न करता ते तिथून पलायन झालेत.यावेळी तीथे काही नागरीकही ऊभे होते.हा सर्व प्रकार नागरिकांनी उभ्या डोळ्यांनी बघत होते.त्यामुळे बातमीदारांचीच उद्धटपट्ठी होत असेल तर जनसामान्यांचा काय असा प्रश्न नागरीकांकडून विचारल्या जात आहे .

स्थानिक गांधी चौकात हाॕटेल संदीप समोर पाच ते सात पोलीस पोळ्याच्या दिवशी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान गस्तीवर होते. दरम्यान एक बातमीदार तिथे पोहचला. व त्यांना मिळालेल्या गुप्त माहीतिनुसार पोलीसांना धाबा मार्गाने दारु येत आहे. तुम्ही धाबा टर्निंगवर दोन तीन पोलीस बघा अशी माहीती दिली. मात्र त्यातील दोन पोलीस शिपाई कोंडेकर व माहुरकर यांनी तीकडे जाने तर सोडा त्या बातमीदाराला तु कोन आम्हाला सांगनारा ? तु सांगितले म्हणून आम्ही जानार का?अशी दमदाठी करत अरेरावी केली. मात्र काही क्षनातच त्या पोलीसांना बातमीदार असल्याचे लक्षात आले. आणि ते तिथून सर्व पोलीस,पोलीस स्टेशन कडे पलायन झाले. यावेळी तिथे काही नागरिकही उपस्थित होते. त्यामुळे या पोलीस शिपायांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचीन्ह उपस्थित झाले असून, नागरिकांनि अनेकानेक प्रश्न उपस्थित करत आहेत. त्या दारुविक्रेत्यासोबत पोलीस शिपाई कोंडेकर व माहुरकरचे साटेलोटे तर नसावे ना?किंवा त्यांना पुर्व कल्पना असावी का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. या सार्या प्रकाराची चर्चा आता गोंडपिपरी शहरात चांगलीच रंगू लागली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन नेहमीच या न त्या कारनाने प्रकाश झोतात येत असल्याचे पहावयास मिळत आहे.अश्या काही अडेलतट्टू पोलीस शिपायांच्या अरेराबीपनामुळे व नाकर्तेपनामुळे गोंडपिपरी पोलीस प्रशासन नेहमीच बदनाम होत असल्याचे पहावयास मिळत आहे. त्यामुळे अश्या पोलीसांवर कार्यवाही होने गरजेचे आहे. अश्या प्रतिक्रिया आता सामान्य नागरिकांकडून जोर धरु लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here