रमाई आवास योजनेतील पात्र लाभार्थी योग्यच — ग्रामस्थांची पत्रपरिषदेत माहिती

0
118

गोंडपिपरी –  गोंडपिपरी पंचायत समिती अंतर्गत गोजोली ग्रामपंचायतला नुकतीच रमाई आवास योजनेअंतर्गत 56 घरकुल पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. ही यादी जाहीर होताच गावातील वासुदेव डोंगरे या ग्रामस्थांनी या यादीवर आक्षेप नोंदवित संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे 25 मंजूर पात्र लाभार्थी हे अपात्र असल्याची तक्रार नोंदविली. या तक्रारीच्या आधारावर पंचायत समिती गोंडपिपरी येथील अधिकाऱ्यांनी पुन्हा फेरचौकशी केली.चौकशी अंती सुद्धा ही यादी पात्र करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी रमाई आवास योजनेतील पात्र लाभार्थी हे नियमानुसारच पात्र असून तक्रार कर्त्याने आकसापोटी वाद निर्माण केल्याची माहिती ग्रामस्थांनी पत्रपरिषदेत केली आहे.

सन 2018-19 मध्ये गोजोली ग्रामपंचायतीकडे 67 कुटुंब प्रमुखांनी अर्ज सादर केले. यात सन 2019-20 मध्ये एकूण 56 नावे मंजूर करण्यात आली. सदर यादीत येथील रहिवासी असलेल्या वासुदेव डोंगरे यांचे नाव समाविष्ट नसल्याने 56 पैकी 25 लाभार्थी हे अपात्र असल्याचा ठपका ठेवीत नवीन अकरा नावे पात्र करावे. या आशयाचा अर्ज संवर्ग विकास अधिकारी गोंडपिपरी यांना फेर चौकशीसाठी केला. सदर तक्रार दाराचे म्हणने तथ्यहीन असल्याचे पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी श्री बुलकुंडे यांनी स्पष्ट केले .
तक्रारकर्त्याचे नाव हे मंजूर यादीत नसल्याने त्यांनी *’मला नाही तर कुणालाच* *नाही’* या भावनेतून हे प्रकरण हाताळत असल्याची माहिती ग्रामस्थांकडून समोर आली. वासुदेव डोंगरे हे बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे मत राजेश डोंगरे, मुन्ना तावाडे, पायल दुर्गे,अमरदास डोंगरे, दिलीप झाडे शेखर बोनगिरवार यासह समस्त नागरिकांनी पत्रपरिषदेत व्यक्त केले आहे. इंडिया दस्तक न्युज टीव्ही.. कार्यकारी संपादक. रवी. रायपूरे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here