खामगाव: कोरडवाहू शेती त्यामुळे शेतक-यांची एकाच पिकांवर अवलंबिता वाढीस लागली आहे. विविध कारणांमुळे पिकांच्या उत्पादकतेत घट झाल्यास शेतक-यामध्ये नैराश्य वाढून आत्महत्या सारखे प्रकारही घडतात, तसेच कृषि तंत्रज्ञान विस्तारात अपू-या कर्मचारी वर्गामुळे कृषि विभागाला मर्यादा आहेत.
त्यामुळे अनेक शेतक-यापर्यंत कृषि विभागाच्या योजना, शेतीविषयक आधारित माहिती, पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान, शेतीविषयक गुंतवणूक, हवामान शास्त्र , जल व मृदसंधारण शेतीपुरक इतर व्यवसाय, पशुपालन, मत्सपालन, कृषि यशोगाथा, धोरणे व योजना, पत्रकार पुरवठा व विमा, कृषि मार्गदर्शक, बाजार पेठ,मार्केटिंग व्यवस्थापन व तंत्रज्ञान हवामानावर आधारित कृषि सल्ला, व इतर माहिती सर्व शेतक-यांपर्यत पोहचवण्याकरीता, मात्र यावर पर्याय म्हणून वैभवसिंह कैलाससिंह पवार यांनी कृषि जैवतंत्रज्ञान ग्रुप समुहाची स्थापना केली. व कृषि विभागाच्या विविध योजनांची माहिती लाभार्थी शेतक-यांपर्यत प्रभावी पोहचवण्या करीता योग्य मार्गदर्शन करत असतात.
सध्या सोशल मीडीया चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे व्हाटसप सारखे प्रभावी माध्यम घराघरात पोहचले आहेत याचीच दखल घेत खामगाव तालुक्यातील संभापुर येथील श्री. वैभवसिंह पवार कृषि जैवतंत्रज्ञान ग्रुप समुह तयार केला त्यामध्ये अनेक तालुक्यातील, जिल्ह्यातील, व राज्यातील लोकांचा समावेश आहे, व सर्व कृषि विभागाचे अधिकारी सुद्धा आहेत,
या ग्रुप समुहाला आतापर्यंत 4 चार वर्षे पुर्ण झाली आहे..आतापर्यंत समुहामध्ये प्रत्येक शेतक-यांना योग्य मार्गदर्शन मिळते ज्यामुळे शेतकरी वर्गाला घरी बसल्या शेतीविषयक आधारित,योजना इत्यादी माहिती मिळण्यासाठी मदत होते आहे.
व्हाट्सएपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती
Advertisements
Advertisements