महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच जिल्हाध्यक्षपदी संजय सातव

369

अनिल गिर्हे

पिंपळगाव राजा- स्थानिक पेठपुरा भागातील संजय समाधान सातव यांची महात्मा ज्योतिबा फुले युवा मंच च्या बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली असून त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. समाजाच्या माध्यमातून समाजसंघटन करण्यासाठी ते नेहमी प्रमाणे आपले सामाजिक कार्य पार पाडत असल्याने संघटनेने त्यांच्याकडे बुलढाणा जिल्हा अद्यक्षपदाची सूत्रे दिली आहेत.त्यांच्या निवडीने परिसरातील समाजबांधवांमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.