HomeBreaking Newsचंद्रपूर जिल्हात 47 बाधित कोरोना मुक्त

चंद्रपूर जिल्हात 47 बाधित कोरोना मुक्त

जिल्ह्यात अॅक्टीव्ह बाधित 17;

आतापर्यतची बाधित संख्या 64

Ø  आज आणखी 2 कोरोना पॉझिटीव्ह

Ø  आज चार बाधित कोरोना मुक्त

Ø  4 हजारांवर नागरिक गृह अलगीकरणात

Ø  संस्थात्मक अलगीकरणात 875 नागरिक

चंद्रपूर,दि.25 जून: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 25 जून रोजी गुरुवारी आणखी दोन बाधित आढळले आहे. यासोबतच जिल्ह्यातील आतापर्यंतची बाधित संख्या 64 झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार बल्लारपूर येथील कन्नमवार वार्डमधील 28 वर्षीय युवक पॉझिटिव्ह आढळला आहे. हैदराबाद येथून शहरात परतल्याची त्याची नोंद आहे. हा युवक 16 जून पासून संस्थात्मक अलगीकरणात होता.

       तर चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील 27 वर्षीय युवतीचा स्वॅब अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. यवतमाळ येथून 21 जून रोजी परत आल्यानंतर ही युवती गृह अलगीकरणात होती. काल तिचा स्वॅब नमुना घेण्यात आला. आज अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.

आतापर्यंत 47 बाधित कोरोना मुक्त होऊन सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्याचा डबलिंग रेट 41.9 आहे.

सेल्फ असेसमेंट, ब्लूटूथ प्रॉक्सीमिटी, फोरकास्ट इमर्जिंग हॉटस्पॉट विषय संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे. सेल्फ असेसमेंटद्वारे 181 नागरिकांशी संपर्क केलेला आहे. यापैकी, 34 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 34 नागरिकांपैकी चार निगेटिव्ह,30 अहवाल प्रतीक्षेत आहे. ब्लूटूथ प्रॉक्सीमिटीद्वारे 103 नागरिकांशी संपर्क केलेला असून  88 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. या 88 नागरिकांपैकी 8 पॉझिटिव्ह, 76 निगेटिव्ह तर प्रतीक्षेत 4 नमुने आहेत.

आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणात आरोग्य सेतू फॉरकास्ट, इमर्जिंग हॉटस्पॉट अंतर्गत 49 गावांमध्ये 49 पर्यवेक्षक, 406 पथके, 22 हजार 125 घरे व 98 हजार 114 लोकसंख्येच्या माध्यमातून 14 हजार 176 कोमॉरबीडीटी  असणाऱ्या व्यक्तींना शोधण्यात आलेले आहे. 118 आयएलआयचे रुग्ण शोधण्यात आले असून 63 स्वॅब घेण्यात आले आहे व उर्वरित नागरिकांचे स्वॅब घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

जिल्ह्यात एकूण 29 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे.यापैकी, 21 कंटेनमेंट झोन 14 दिवस पूर्ण झाल्यामुळे बंद करण्यात आलेले आहेत. तर, 8 कंटेनमेंट झोन सध्या कार्यरत आहे.

ग्रामीण भागामध्ये तालुका चंद्रपूर 7, बल्लारपूर दोन, पोंभूर्णा दोन, सिंदेवाही दोन, मुल तीन, ब्रह्मपुरी 12, नागभीड चार बाधित आहे. शहरी भागामध्ये बल्लारपूर चार, वरोरा दोन, राजुरा दोन, मुल, भद्रावती, ब्रह्मपुरी,कोरपणा,नागभिड प्रत्येकी एक बाधित आहेत. तर चंद्रपूर महानगरपालिका भागामध्ये कृष्णनगर दोन, बिनबा गेट एक, बाबुपेठ तीन, बालाजी वार्ड , भिवापूर वार्ड , शास्त्रीनगर प्रत्येकी एक, सुमित्रानगर चार, स्नेह नगर एक, बिनबा वार्ड एक, लुंबिनी नगर 4 बाधित आहेत. असे एकूण बाधितांची संख्या 64 वर गेली आहे.

कोविड-19 संक्रमित 64 बाधितांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून, रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे बाधितांची संख्या वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -5, हरियाणा (गुडगाव)-1, ओडीसा-1, गुजरात-4, हैद्राबाद-6, मुंबई-10, ठाणे -3, पुणे-6, नाशिक -3, जळगांव-1, यवतमाळ -5, प्रवासाचा कोणताही इतिहास नसलेले-4, संपर्कातील व्यक्ती – 15 आहेत.

जिल्ह्यात 3 हजार 632 स्वॅब नमुने तपासणीस पाठविलेले होते. यापैकी 64 नमुने पॉझिटिव्ह, 3 हजार 209 नमुने निगेटिव्ह, 332 नमुने प्रतीक्षेत आहेत. तर 27 नमुने अनिर्नयित आहेत. जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणा विषयक माहिती पुढीलप्रमाणे आहे. एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 875 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 231, तालुकास्तरावर 318, तर जिल्हास्तरावर 326 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 79 हजार 991 नागरिक दाखल झालेले आहेत. 75 हजार 500 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले आहे. तसेच 4 हजार 491 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित) आणि 25 जून (एकूण दोन बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 64 झाले आहेत. आतापर्यत 47 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे  64 पैकी अॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता 17 आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!