पोटेगाव येथे भाजपची संघटनात्मक बैठक संपन्न; रेखाताई डोळस यांची उपस्थिती

प्रतिनिधी गौरव बुरांडे घोट
पोटेगाव : काल दिनांक ३ रोजी पोटेगाव येथे भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव वतीने रेखाताई डोळस यांनी बूथप्रमुख आणि शक्तिकेंद्र प्रमुखांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून रेखाताई डोळस, मा. वसंत जी गावतुरे, मा. नेपाळ भाऊ माधमवार बूथप्रमुख डोंगरगाव, मा. प्रकाश भाऊ चुधरी भाजपा कार्यकर्ता, मा. भूषण भाऊ बोबाटे भाजपा कार्यकर्ता, मा. मधुकरजी बावणे भाजपा कार्यकर्ता, किशोरभाऊ मूनरत्तीवार बूथप्रमुख पोटेगाव, मा. कांताताई हलामी सरपंच राजोली, मा. शालूताई गेडाम भाजपा कार्यकर्ता, मा. ज्ञानेश्वर दामले, मा. संजय तुंकलवार, मा. रवी सुरपाम, मा. विजय जुमनाके, मा. नेताजी कुमरे,उपस्थित होते.
प्रत्येक बूथ स्तरावर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी ‘बूथ जिंका, निवडणूक जिंका’ हा मंत्र कार्यकर्त्यांना देण्यात आला.केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितकारी योजना तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना रेखाताई डोळस यांनी दिल्या. शक्तिकेंद्र प्रमुखांनी आपल्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बूथ प्रमुखांशी समन्वय ठेवून कामाचा वेग वाढवण्यावर चर्चा झाली. कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर स्थानिक पातळीवर कशी मात करता येईल, यावरही बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले.
“पक्षाचा खरा कणा हा बूथ स्तरावरील कार्यकर्ता आहे. आगामी काळात जनसंपर्क वाढवून आपल्याला प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचे आहे,” असे आवाहन रेखाताई डोळस यांनी यावेळी केले.







