Home Breaking News एटापल्लीमध्ये सुगंधित तंबाखू तस्करीचा पर्दाफाश; २५ हजारांचा मुद्देमाल जप्त…

एटापल्लीमध्ये सुगंधित तंबाखू तस्करीचा पर्दाफाश; २५ हजारांचा मुद्देमाल जप्त…

201

एटापल्लीमध्ये सुगंधित तंबाखू तस्करीचा पर्दाफाश; २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

तालुका प्रतिनिधी आदित्य चिप्पावार एटापल्ली :

एटापल्ली: शहरात बेकायदेशीर सुगंधित तंबाखू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तस्करीचा पर्दाफाश केला आहे. दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ रोजी एटापल्ली पोलिसांनी अंडा चौक परिसरात धाड टाकून सुमारे २५ हजार रुपये किमतीचा ‘मजा’ सुगंधित तंबाखू जप्त केला आहे.
छातीसगड येथून एटापल्लीकडे बेकायदेशीररीत्या तंबाखू विक्रीसाठी आणला जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून मोटारसायकल क्रमांक CG 19 T 8317 चा पाठलाग करण्यात आला. सदर वाहनावरून रमेश हिरा व देवव्रत सिकदर हे दोघे सुगंधित तंबाखू वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले.
विशेष म्हणजे, हा तंबाखू एटापल्लीतील एका ‘मोठ्या व्यापाऱ्याला’ पोहोचविण्यात येणार होता, अशी चर्चा सध्या जोरात असून, यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे.
ही धडक कारवाई पोलीस निरीक्षक नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. चंद्रशेखर शेकुर्तिवार यांनी पाठलाग करून मुद्देमाल व वाहन जप्त केले. पुढील तपास API मोतीराम जी मडावी करत असून, या तस्करीमागील ‘ हस्ती’ कोण? याचा कसून तपास सुरू आहे.
एटापल्ली परिसरात अवैध सुगंधित तंबाखू विक्रीवर पोलिसांची ही कारवाई तस्करांच्या गोटात खळबळ उडवणारी ठरली असून, पुढे आणखी धक्कादायक नावे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Don`t copy text!