Home Breaking News सुग्रीव गोतावळे यांना महाराष्ट्र भुषण पुरस्काराने केले सन्मानित…

सुग्रीव गोतावळे यांना महाराष्ट्र भुषण पुरस्काराने केले सन्मानित…

600

बळीराम काळे,जिवती

जिवती (ता.प्र.) : तालुक्यातील दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी येथील पत्रकार, सुग्रीव अर्जुनराव गोतावळे यांना पत्रकारिता क्षेत्रातील या वर्षाचा सर्वोच्च ‘ महाराष्ट्र भुषण पुरस्कार’,महाराष्ट्र लोक न्युज चॅनल चे मुख्य संपादक गजानन पाटील देठे, उपसंपादक योगेश पाटील निकम व जे.जे. हॉस्पिटल चे संचालक डॉ. जीवन राजपुत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.पत्रकार श्रेत्रात आपल्या लेखनीतून शेतकरी, कामगार, गोरगरीब, सामान्य जनतेला सामाजिक, न्याय,मिळविण्याकरीता दैनिक वर्तमानपत्रातुन आपल्या भुमिका मांडून अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत असल्याने.या पुरस्कारासाठी त्यांची महाराष्ट्र लोक न्युज चॅनलने निवड केली होती.हा पुरस्कार प्रदान सोहळा दि. ४ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र लोक न्युज चॅनलच्या वर्ष ५ वे वर्धापन दिनाच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी नगर येथे ‘ महाराष्ट्र भुषण पुरस्कार’ देण्यात आला.यावेळी जाफराबाद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गोविंदराव पंडित, पंचायत समितीचे सदस्य मधुकर पाटील गाढे, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तू पाटील पंडित, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक बनकर व महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांतून अनेक पत्रकार व महिला प्रतिनिधी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या‌ सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, व्यावसायिक, उद्योग व पत्रकारिता या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तिमत्वांना हा पुरस्कार प्रदान केल्या जातो. या पुरस्कार सोहळ्यासाठी युवक व महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिवती तालुक्यातील पत्रकार , राजकीय व सामाजिक, शैक्षणिक व अन्य क्षेत्रातील आप्तेष्ट मित्रमंडळी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले आहे.

Don`t copy text!