Home Breaking News अमरावती येथील रेखाताई हजारे यांची श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना शिवसेना विदर्भ कार्याध्यक्ष...

अमरावती येथील रेखाताई हजारे यांची श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना शिवसेना विदर्भ कार्याध्यक्ष पदी नियुक्ती…

151

संपादक प्रशांत बिट्टूरवार

महाराष्ट्र उपमुख्यमंत्री मा. श्री.एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने अमरावती येथील रेखाताई हजारे यांची श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना शिवसेना विदर्भ कार्याध्यक्ष पदी नियुक्ती.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब, यांच्या आदेशाने
तसेच श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री. बाबासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अमरावती येथील धडाडीचे नेतृत्व असणाऱ्या श्रीमती. रेखाताई हजारे यांची शिवसेना प्रेरित श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना विदर्भ कार्याध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात आली.
कामगार वर्ग, शेतकरी आणि असंघटित क्षेत्रातील मजुरांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाचे सतत प्रयत्न सुरू आहेत.
या परंपरेला पुढे नेत आज विदर्भाच्या कार्याचा विस्तार करण्याच्या उद्देशाने एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार श्रीमती रेखा संदीप हजारे यांची विदर्भ कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांची ही नियुक्ती केवळ सन्मानाची नाही तर संपूर्ण विदर्भातील कामगार वर्गासाठी आशेचा किरण ठरणार आहे.
रेखाताई हजारे या २०१८ पासून समाजकार्यात व राजकारणात सक्रिय असून, त्यांनी अनेक गरीब, शेतकरी, महिला व कामगारांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे.
त्यांच्या कार्यशैलीत नेतृत्व, संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा यांचा संगम दिसून येतो.
विदर्भातील अनेक औद्योगिक भागांतील कामगारांच्या समस्या — वेतन थकबाकी, सुरक्षा, कामगार कल्याण निधी आणि सामाजिक सुरक्षेचे प्रश्न — यावर त्यांनी थेट संवाद साधून तोडगा काढला आहे.

रेखाताईंच्या नेतृत्वामुळे विदर्भातील कामगारांना संघटनेवर विश्वास बसला आहे आणि त्यांच्या आवाजाला नवी ताकद मिळाली आहे.
त्यांनी महिला मजुरांसाठी विशेष उपक्रम राबवले असून, अनेक महिलांना आत्मनिर्भरतेकडे नेले आहे

तसेच अमरावती जिल्ह्यातील सागर भाऊ वानखडे यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून रेणुका ताई सपाटे यांची महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आलीआहे. सोबतच अमरावती तालुक्यातील तालुका अध्यक्षाची कार्यकारणी पण जाहीर करण्यात आली आहे .
त्यामध्ये प्रवीण सहारे अमरावती तालुका,निलेश कोराटे भातकुली,धनराज जवंजाळ धारणी चिखलदरा, आदित्य वानखडे चांदूर बाजार ,नितिन टिपरे मोर्शी, उज्वल बोंडे अचलपूर (परतवाडा),प्रफुल सर्वे चांदुर रेल्वे ,आकाश मुन धामणगाव रेल्वे,सचिन कट्यारमल दर्यापूर ,विकास इंगळे अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तालुका अध्यक्षाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Don`t copy text!