Home Breaking News दुर्गापूर वायगाव जिल्हा परिषद क्षेत्र हा माझा घर आहे-शिल्पा रॉय…

दुर्गापूर वायगाव जिल्हा परिषद क्षेत्र हा माझा घर आहे-शिल्पा रॉय…

151

दुर्गापुर वायगाव जिल्हा परिषद क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
शिल्पा राय माजी जिल्हा परिषद सदस्य वायगाव दुर्गापुर जिल्हा परिषद निर्वाचन क्षेत्र

प्रतिनिधी सतीश कुसराम

येणापूर:
नुकताच दुर्गापुर वायगाव जिल्हा परिषद क्षेत्र येथे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व बूथ प्रमुख यांची महत्त्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीत प्रमुख अतिथी भाजपा नेते आशिष भाऊ पिपरे माजी जिल्हा परिषद सदस्य शिल्पा राय व दुर्गापुर वायगाव क्षेत्रातील बूथ प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थिताना भाजप नेते आशिष भाऊ पिपरे जिल्हा परिषद सदस्य शिल्पा राय यांनी मार्गदर्शन केले यावेळी आपल्या मार्गदर्शन भाषणात शिल्पा राय यांनी सांगितले दुर्गापूर वायगाव जिल्हा परिषद क्षेत्र हा माझा घर आहे व या ठिकाणी मी जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक विकासाचे काम केले व लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार अशोक भाऊ नेते व विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मिलिंद भाऊ नरोटे आणि माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकारचे जनकल्याणकारी कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत घेऊन गेले आहे व सबका साथ सबका विकास हा नारा घेऊन घरोघरी भारतीय जनता पार्टी चा विकास अजेंडा पोहोचवलेला आहे व सर्वसामान्य कार्यकर्ते पदाधिकारी हे मोठ्या संख्येने आपण मी पुन्हा या क्षेत्रातून नेतृत्व करावे अशी आग्रही मागणी केली व या ठिकाणातून मला भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास मी पुन्हा निवडणूक लढवण्यास सज्ज आहे त्यामुळे सर्वसामान्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पक्षासोबत राहावे व या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला चालना दयावे व सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले .यावेळी दुर्गापूर वायगाव क्षेत्रातील सर्व बूथ प्रमुख पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!