Home Breaking News जिल्ह्यात निवडणुकीची हालचाल जोमात!उमेदवारांची गावो गावी भेट…

जिल्ह्यात निवडणुकीची हालचाल जोमात!उमेदवारांची गावो गावी भेट…

98

अनेक उमेदवार आपल्या क्षेत्रातील गावो गावी देत आहेत भेट
इच्छुक कार्यकर्त्यासह संभ्रम, अनेकांची भूमिका गुलदस्त्यात, सर्वांचेच वेट अँड वॉच
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुकाने जोरदार तयारी केली आहे, काहीही झाले तरी निवडणूक लढवणार हे निश्चित असले तरी अनेकांचां पक्ष अनिश्चित आहे, त्यामुळे बहुतांश गडचिरोली जिल्ह्यामधील सर्वच मतदारसंघात इच्छुकासह कार्यकर्त्यांमध्ये सम्रावस्था आहे ,कोणत्या पक्षाची उमेदवारी घ्यायची हे गुलदस्त्यात ठेवत अनेक इच्छुकांनी “वेट अँड वॉच”(प्रतीक्षा करा आणि पहा) अशी भूमिका स्वीकारली आहे,
जिल्हा परिषद, पंचायत समिती सभागृहाची मुदत संपून जवळपास तीन वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे ,तरीही निवडणुकांची तारीख अध्याप निश्चित झालेली नाही ,परंतु मतदारसंघाचे झालेले पुनर्रचना आणि आरक्षण सोडत त्यामुळे आता कोणत्याही क्षणी या निवडणुकीचा बिगुल वाजणार हे गृहीत धरूनच अनेक इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे,
अनेक मतदारसंघांमध्ये आरक्षण बदलल्याने अनेकांनी निवडणूक लढवण्यापूर्वीच आपली तलवार तयार केली आहे वरून स्वतः नसलो तरी पत्नी ,मुलगा ,सून कुटुंबातील व्यक्ती किंवा जवळील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी जोरदार अनेकांनी दर्शवली आहे त्यानुसार बहुतांश सर्वच जिल्हा परिषद पंचायत समिती मतदार संघामध्ये विरोधकांच्या हालचालीला लक्ष केंद्रित केले आहे,
वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता आली ,या सत्तेचा लाभ मिळवण्यासाठी विधानसभा निवडणुकीनंतरही महायुतीतील घटक पक्षांमधील आयारामांची संख्या वाढत चाललेली आहे, त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुतीकडून इच्छुकांची संख्या अधिकच असणार हे नक्की, इच्छुकांच्या वाढत्या संख्येमुळे जागा वाटपाचा तिढा अधिकच असणार आहे त्यामुळे दोन्ही आखाड्या अंतर्गत चर्चा आघाडीची असली तरी तयारी मात्र इच्छुक उमेदवारांची स्वबळाचीच,
पक्षप्रवेशाच्या वेळी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता कशी करणार हाच खरा प्रश्न सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या समोर आहे इच्छुकांची समजूत कशी काढायची हीच पक्ष नेतृत्वाची खरी कसोटी ठरणार आहे,उमेदवारांची अपेक्षापूर्ती न झाल्यास अनेकांनी पुन्हा पक्षांतरांची तयारी केली आहे, उमेदवारीवरून बहुतांशी सर्वच पक्षांनाही पक्षांतरांचे ग्रहण लागणार आहे हे मात्र निश्चित ,त्यामुळे इच्छुकांनी आपापल्या नेत्यांच्या भेटीगाठी करत मी हे करेन मी ते करेन विद्यमान आमदार खासदार माजी आमदार खासदार हे आपलेच जवळील असल्याची जाणीव इच्छुक उमेदवार करीत आहेत, एवढे करून सुद्धा उमेदवारी न मिळाल्यास बंडखो वाढणार हे नक्की च, बंडखोरी वाढल्यास नेत्यांना अनेक मतदारसंघात मैत्रीपूर्व लढतीचा निर्णय घ्यावा लागणार आहे.

Don`t copy text!