प्रतिनिधी सिद्धार्थ दहागावकर
राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री. आचार्यजी_देवव्रत व मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी_फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी_शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत “प्राकृतिक कृषी संमेलन २०२५” पार पडले.
यावेळी राज्यपाल महोदय यांनी सांगितले की, “नैसर्गिक शेती ही केवळ तंत्र नाही तर एक जीवनशैली आहे, जी शेतकऱ्यांना स्वावलंबी आणि पर्यावरणस्नेही बनवते.”
तसेच माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले की, नैसर्गिक शेती शाश्वत विकासाकडे नेणारी दिशा असून २५ लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्याचा राज्य सरकारचा संकल्प आहे.
या संमेलनातून नैसर्गिक शेतीचे आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय फायदे याबाबत मला अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळाली. या माध्यमातून शाश्वत शेती आणि निसर्गाशी सुसंवाद साधण्याचा प्रेरणादायी संदेश आजच्या या संमेलनातून प्राप्त झाला आहे. या माध्यमातून आमच्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल!







