अपघातात वनरक्षक गंभीर
प्रतिनिधी/रेगडी
रेगडी येथून अवघ्या अर्धा किमी अंतरावर असलेल्या पूलावर मोठा खड्डा झाला असून या खड्यात भरधाव दुचाकी गेल्याने अनियंत्रित होऊन दुचाकी स्वार वनरक्षक गंभीर जखमी झाला आहे

सदर घटना आज दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली अपघातात जखमी झालेल्या वनरक्षकास सामाजिक कार्यकर्ता प्रशांत शाहा यांनी शनाचाही विलंब न लावता तात्काळ रेगडी आरोग्य केंद्रात दाखल केले त्यांच्यावर रेगडी येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे सदर वनरक्ष जगन्नाथ नरोटे हे मुलचेरा तालूक्यातील हेटळकसा येथील रहिवासी आहेत
रस्त्यावरील याच खड्यात अनेक दुचाकी धारक पडल्याचे बोलले जात आहे.सदर खड्डात एखादी जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार का खड्डे बुजवणार का असा प्रश्न यावेळी निर्माण होत आहे
घोट रेगडी मार्गावरील खड्डे तात्काळ बुजवा अन्यथा रस्ता रोको आंदोलन करणार असा इशारा यावेळी शिवसेना जिल्हा सचिव प्रशांत शाहा यांनी दिला आहे.







