Home Breaking News शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्त फराळाचे वाटप…

शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्त फराळाचे वाटप…

161

जिल्हा प्रतिनिधी नितेश खडसे

मा. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. श्री. छेरिंग दोरजे यांच्या उपस्थितीत शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिवाळी निमित्त फराळाचे वाटप

गडचिरोली जिल्हा हा गाओवाददृष्ट्‌या अतिसंवेदनशिल जिल्हा म्हणून ओळखला जातो, गडचिरोली पोलीस दलातील जवान हे माओवाद्यांशी लढताना आपल्या मोठे शौर्य आणि पराक्रमाचे प्रदर्शन करीत असतात. आपले कर्तव्य बजावीत असताना गडचिरोली जिल्ह्यात विविध सुरक्षा दलांच्या एकूण २१३ जवानांनी सर्वोच्च बलीदान दिले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शहीद जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत गडचिरोली पोलीस दलाच्या पतीने दिवाळी सणानिमीत्त मा. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. श्री. छेरिंग दोरजे व इतर वरीष्ठ अधिकार्याच्या उपस्थितीत शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांकरीता आज दिनांक १६/१०/२०२५ रोजी दिवाळी फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात मा. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) श्री. छेरिंग दोरजे यांनी शहीद जवानांच्या कुटुंचियांशी संवाद सायत दिवाळीच्या शुभेच्छा देताना आपल्या भाषणात त्यांनी सांगितले की, ‘गडचिरोली पोलीस दलातील सर्व जवान अतिशय शीर्याने माओवादाचा सामना करीत आहेत. या लढाईत शहीद इझालेल्या जवानांच्या बलिदानामुळेच गडचिरोली जिल्हा आज माओवादापासून मुक्त होण्याच्या गार्गावर आलेला आहे. सर्व शहीद जवानांचे कुटुंबिय हे आगच्या कुटुंबाप्रमाणेच असून महाराष्ट्र पोलीस व गडचिरोली पोलीस दल नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. यानंतर मा. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. श्री. छेरिंग दोरजे, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहीद जवानांच्या कुटुंबातील उपस्थित सर्व कुटुंबियांची समक्ष भेट घेत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या हस्ते दिवाळी फराळ भेट दिला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

सदर कार्यक्रमाकरिता अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. श्री. छेरिंग दोरजे, पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री, नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. हे उपस्थित होते.

Don`t copy text!