जिल्हा प्रतिनिधी नितेश खडसे
सर्वोच्च न्यायालयाचे निर्णयानुसार शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे त्यानुसार सर्व शिक्षकांमध्ये संबंधित निर्णयाविरुद्ध असंतोष पसरलेला असून सेवानिवृत्तीचे पाच वर्ष शिल्लक असलेल्या सर्व शिक्षकांना ही परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे त्याकरिता दोन वर्षाचा कालावधी दिला असून दोन वर्षांमध्ये त्यांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली नाही तर त्यांचे पुढील प्रमोशन किंवा नोकरी गमवावी लागणार आहे त्यामुळे शासनाने शिक्षकावर अन्याय होऊ नये म्हणून योग्य ते पावले उचलावी व शिक्षकांना टीईटी परीक्षेमधून मुक्त करावे परीक्षा उत्तीर्ण करण्याची शक्ती फक्त शिक्षकांवरच का असाही प्रश्न शिक्षक संघटनेंकडून उपस्थित केल्या जात आहे 2013 पूर्वी लागलेल्या शिक्षकांना महाराष्ट्र शासनाने सदर परीक्षेतून सूट दिलेली आहे हे विशेष या मागणीचे निवेदन शिवसेना शिक्षक आघाडी चे अध्यक्ष भूषण अलामे तसेच शिक्षक समिती चे तालुका अध्यक्ष बंडूभाऊ शीडाम व वडसा तालुक्यातील शिक्षकांनी गडचिरोली जिल्ह्याचे सह पालकमंत्री ऍडव्होकेट आशिष जयस्वाल साहेब यांना दिले आहे







