कूरखेडा येथे दशहरा मैदानात भव्य आतिशबाजीत रावण दहन, शिवसेना व गावकर्यांची ३६ वर्षाची अखंड परंपरा…

171

प्रतिनिधी सतीश कुसराम

कूरखेडा- शहरातील सतीनदी घाटावर असलेल्या दशहरा मैदानात भव्य डोळ्यांची पारणे फेडणारी आतिशबाजी करीत शिवसेना व गावकर्यांचा संयुक्त विद्यमाने शहरातील सलग ३६ वर्षाची परंपरा कायम राखत आज दि.२ आक्टोबंर गूरूवार रोजी सांयकाळी ७.३० वाजेचा सूमारास असत्यावर सत्याचा विजयचा प्रतिक असलेला अहंकारी रावनाचा प्रतिमेचे दहन करण्यात आले.
तत्पूर्वी गांधी वार्ड कूरखेडा येथून ट्रक्टर सजवलेल्या रथात राम लक्ष्मण व हनुमान यांचा वेशभूषेत असलेल्या बाल कलावंताची वाजत गाजत भव्य शोभायात्रा सतीनदी घाटावरील दशहरा मैदानात पोहचली येथे शिवसेना नेते तथा शहरात सन १९८९ पासून सलग भव्य रावन दहन परंपरेचे नेतृत्व करणारे सूरेंन्द्रसिंह चंदेल व उपस्थीत मान्यवरांचा हस्ते दहन पूर्व रावनाचा प्रतिमेची पूजा करण्यात आली व भव्य फटाक्यांची आतिशबाजी करीत रावनाचा प्रतिमेचे दहन करण्यात आले याप्रसंगी मान्यवरानी मार्गदर्शनातून प्रकांड पंडित विदवान असलेल्या रावनाचा अति अहंकारा मूळे सर्वनाश झाला त्यामूळे अहंकाराला अवगूणाला तिलांजली देत भगवान राम यांचा जिवनाचा आदर्श घेण्याचे आवाहन करण्यात आले याप्रसंगी शिवसेना माजी जिल्हाप्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल माजी नगराध्यक्ष डॉ महेन्द्र कूमार मोहबंसी,माजी जि प सदस्य पि आर आकरे कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेव फाये सामाजिक कार्यकर्ते विलास गावंडे नगरपंचायत उपाध्यक्ष बबलू भाई हूसैनी नगरसेवक ऍड उमेश वालदे नगरसेवक जयेंद्र चंदेल नगरसेवक अशोक कंगाले,संजय देशमुख,माजी सभापति पूंडलीक देशमुख शिवसेना तालुका अध्यक्ष अनिकेत आकरे, तालुका पत्रकार संघटणेचे अध्यक्ष सिराज पठान,दामोधर उईके,यूवती सेनेचा प्राचार्य उमा चंदेल भाजपा जिल्हा सचिव रूपाली कावळे नगरसेविका जयश्री रासेकर कांताबाई मठ्ठे अश्वीनी पिंपळकर शारदा गाथाडे, अशोक डोंगरवार, प्रकाश खोबरे, किशोर हरडे आदि हजर होते आतिषबाजीची जबाबदारी राकेश चव्हाण, विजय पाटील पूस्तोडे गजानन भोयर राकेश सहारे अनिल उईके देवेन्द्र मेश्राम यानी यशस्वीपणे पार पाडली यावेळी सूरक्षा व्यवस्थेची जबाबदारी ठाणेदार महेन्द्र वाघ यांचा नेतृत्वात साहायक पोलीस निरीक्षक प्रियंका आघाव पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक देवराव सहारे व पोलीस चमूने चोखपणे पार पाडली