विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना व्यासपीठ देणारा ‘एकता दुर्गा मंडळ’…

701

प्रतिनिधी विशाल शेंडे

गरबा, रांगोळी, संगीत खुर्ची स्पर्धांतून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खुलवला

वरूर रोड: विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देत ‘एकता दुर्गा मंडळ’ने विविध स्पर्धांचे आयोजन करून एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. या रंगतदार स्पर्धांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खुलला आणि त्यांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळाले.

राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथील एकता दुर्गा मंडळ तर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांसाठी गरबा, रांगोळी, संगीत खुर्ची, हंडी फोडणे यासह विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ही स्पर्धा सोमवार, मंगळवार व बुधवार या तीन दिवस सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास पार पडली.या विविध स्पर्धांना विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. स्पर्धेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक धनश्री पिदुरकर, द्वितीय रोहिणी चौथले तर तृतीय रोहन जयपूरकर याने पटकावला. उत्तेजनार्थ पारितोषिक आरोही कमलवार व आदित्य निमकर यांना प्रदान करण्यात आले.बक्षीस वितरणाचा कार्यक्रम गुरुवार, दिनांक २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती व दसरा विजयादशमीच्या शुभदिनानिमित्त सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रम प्रसंगी सरपंच गणपत पंधरे, पोलीस पाटील बंडू भोंगळे, घनश्याम पिंपळशेंडे, नवनाथ बोरकुठे, सुभाष आस्वले, खंडू डाहुले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आदित्य चन्ने, केतन जयपूरकर, आमिर आस्वले, सुमित चौथले, गौरव बोरकुठे, साहिल चौथले, राजू जीवतोडे, समीर बाकेवार, रजनीकांत बोरकुठे, कपिल जंपलवार, लिलाधर आस्वले, नयन हिवरे, शुभम बोरकुठे, तुषार वडस्कर , गणेश कुचणकर, अमोल रणदिवे, अनिकेत वडस्कर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या उपक्रमास गावातील विद्यार्थी तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला…