बहुजन समाज पार्टी तर्फे जटपूरा प्रभाग क्र 7 पिण्याच्या पाण्याच्या समस्या प्रती आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यात आले
सहसंपादक श्याम मशाखेत्री
जटपूरा प्रभाग क्र 7 येथील चोर खिडकी, जवई मोहल्ला, तथागत बुद्ध विहार, सम्राट अशोक चौक, जय भीम चौक, चंद्रपूर समाचार, पवन सुत दवा बाजार व जलनगर या ठिकाणी राहणारा नागरिकांना घरी पिण्याच्या पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी इकडे तिकडे भटकावं लागते आहे. अमृत योजने अंतर्गत “घर तिथे नळ व नळ जल” या द्वारे घरोघरी नळ दिलेले आहे. परंतु सदर नळाला पाण्याची पुरवठा होत नसल्याने नागरिकांना फारच त्रास होत आहे.
याबाबत वारंवार पाणी पुरवठा विभाग संपर्क साधला परंतु त्यांचेकडून काहीच प्रतिसाद मिळत नाही. तेथील कार्यरत अभियंते सुद्धा टाळाटाळीचे उत्तर देतात ही बाब अतिशय अशोक गंभीरता आहे. तरी उन्हाळ्यात अपेक्षा अधिक गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा सदर भागातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या त्वरीत दूर करावी. अन्यथा बहुजन समाज पार्टी बसपा चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष अविनाश वानखेडे, डॉ विश्वनाथ लाडे जिल्हा उपाध्याय, झोन इन्चार्गे किशोर चिकते, रवींद्र कुमार गाडम, अखिल निमगडे, विवेक दुपारे, प्रणित तोडे पदाधिकारी आंदोलन चा मार्ग पत्कारावा लागेल.