प्रतिनिधी गौरव मोहबे
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, चंदनखेडा, येथे पुरूष अधिक्षक म्हणुन कार्यरत असलेला भ्रष्ट, लाचखोर, शासकीय कर्मचाऱ्याचा, आपल्या पत्नीचा आसरा घेत, न्यायालयीन परिसरात, श्री. राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार यांचेवर भ्याड हल्ला
सविस्तर वृत्तानुसार, धनेष पोटदुखे हा शासकीय कर्मचारी, पुरूष अधिक्षक म्हणुन, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चंदनखेडा, येथे कार्यरत आहे. पण त्याआधी तो दिनांक ०४/१२/२०१८ ते दि. ३१/०५/२०२५ म्हणजेच तब्बल ७ वर्ष ३ महिणे शासकीय माध्यमिक तथा उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा बोर्डा, येथे पुरूष अधिक्षक म्हणून कार्यरत होता. एखादा शासकीय कर्मचारी, एकाच आस्थापनेवर, इतका प्रदिर्घ काळ कसा काय कार्यरत राहु शकतो?, याबाबतची विचारणा, भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया या देशव्यापी संघटनेचे, जिल्हाध्यक्ष / जिल्हा वार्ताहर श्री. राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार यांनी धनेष पोटदुखे याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना केली होती. तसेच याच काळात, बोर्डा येथील, शासकीय वस्तीगृहाशी निगडीत असलेल्या सर्व शासकीय देयकात, तसेच शाळेत आयोजित विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादीला लागणारे साहित्य, जेवण, मंडप, डेकोरेशन, इ. सामग्री पुरवठा करणाऱ्या स्थानिक कंत्राटदारासोबत हात मिळवनी करून, ज्यादा रक्कमेची वाढीव देयके दाखवून, प्रत्येक देयकाच्या रक्कमेत आपली हिस्सेदारी तो राखून ठेवायला सांगायचा, अशी तकार संघटनेस प्राप्त झाल्याने, श्री. राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार, यांनी त्याबाबतची विचारणी सुद्धा तकारवजा निवेदणाद्वारे त्यांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे केली होती.
वरीष्ठ अधिकाऱ्याकडुन चौकशी झाल्यास, आपले सगळे आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येतील, व आपण प्रशासकीय कार्यवाहीत दोषी आढळुन, आपल्यावर प्रशासकीय व दंडात्मक कार्यवाही होईलच, याची धनेष पोटदुखे याला पुरेपूर कल्पना होती., याच भितीने त्याने आपल्या पत्नीशी संगनमत करून, ती स्त्री असल्याचा फायदा घेत, तीला समोर करून “तु माझ्या बायकोच्या अंगावर हात टाकतो, अंगावर येतो,” असे बिन बुडाचे आरोप करून, जेव्हा दि. २३/०९/२०२५ रोजी राहुल पुरुषोत्तमराव
कुकडपवार, हे न्यायालयीन परीसरात, न्यायालयीन कामाकरीता गेले असता धनेष पोटदुखे याने आपल्या पत्नीसोबत, श्री. राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार यांना अश्लील शिवीगाळ करून, लाठीकाठीने मारहान लाठीकाठीने मारहान करण्यास सुरूवात केली. हा हा सर्व प्रकार न्यायालयीन परीसरात, असलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला आहे. त्यानंतर लगेचच श्री. राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार, यांनी स्वत:ला सावरत रामनगर पोलीस ठाणे गाठले, व झालेल्या संपूर्ण प्रकाराची रितसर तक्रार दिली. धनेष पोटदुखे व त्याच्या पत्नीवर, भादवी कलम ११५(२), ३५१ (२), ३५२ नुसार गुन्हा दाखल झालेला आहे. सोबतच या घटनेबाबतचा संपूर्ण पुराव्या सहीतचा पत्रव्यवहार, धनेष पोटदुखे
याच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना केलेला आहे.
तरी अशा हिंसक, प्रशासकीय व दंडात्मक कार्यवाही पासुनच्या बचावासाठी, स्वत:च्या पत्नीचाच गैरवापर करणाऱ्या, भ्रष्ट, लाचखोर पुरूष अधिक्षक धनेष पोटदुखे व त्याच्या पत्नीवर कठोरात कठोर कार्यवाही करून अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे श्री. राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार, यांनी शिष्ठ मंडळासोबत मा. ठाणेदार श्री. शेख साहेब, रामनगर पोलीस ठाणे यांना दिलेले आहे.
सोबतच धनेष पोटदुखे सारखा हिंसक मनोवृत्तीचा शासकीय कर्मचारी हा शासकीय सेवेत राहण्याच्या लायकीचा नसल्याने त्याला शासकीय सेवेतुन तात्काळ बडतर्फ करण्याचे तक्रारवजा निवेदन संपूर्ण पुराव्यासहीत श्री. राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार, यांनी मा. ना. श्री. डॉ. अशोक उईके साहेब, आदिवासी विकास मंत्री, सुद्धा केलेली आहे. महाराष्ट्र राज्य, व तसेच आदिवासी विकास विभागाच्या संपूर्ण वरीष्ठ अधिकाऱ्यांना
घडलेल्या संपूर्ण गंभीर प्रकारावर (गुन्हा), विभागातर्फे व तसेच प्रशासनातर्फे लवकरात लवकर कठोर पाऊले उचलुन, आरोपी धनेष पोटदुखे, पुरूष अधिक्षक, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा चंदनखेडा, व त्याचे पत्नीवर योग्य ती कठोर कार्यवाही करून, धनेष पोटदुखे यास शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याचे आवाहन श्री. राहुल पुरुषोत्तमराव कुकडपवार यांनी या पत्रकाद्वारे केलेली आहे.